10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! तटरक्षक दलात भरती सुरू, 29000 रूपये पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर याबाबत १६ मार्च रोजी अर्ज प्रक्रियेची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. ही भरती यांत्रिक पदांसाठी घेण्यात येणार असून जवळपास ३७ जागांवर अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी या निकषांच्या आधारे घेण्यात येईल.

इच्छुक उमेदवार ICG यांत्रिक ०२/२०२० बॅचच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे. उमेदवारांनी कोस्ट गार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला joinindiancoastguard.gov.in भेट द्यावी.

खालील रिक्त पदांवर अर्ज मागविण्यात येत आहेत –
यांत्रिक (मेकॅनिकल) – १९ पद
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – ३ पदे
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन) – १५ पदे
एकूण – ३७ पदे

शैक्षणिक पात्रता –
– दहावी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेचा डिप्लोमा,
– दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचा डिप्लोमा ६० टक्क्यांनी उत्तीर्ण असावा. (AICTE मान्यता आवश्यक)

वयोमर्यादा –
१८ ते २२ वर्षे

वेतन –
बेसिक वेतन हे २९,२०० रुपये ते ४७,६०० रुपयांपर्यंत असेल.