भारतीय तटरक्षक दलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, यांत्रिक पदांसाठी 37 जागांवर ‘भरती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यांत्रिक पदांच्या 37 जागांवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. या जागांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च असणार आहे.

पदे (यांत्रिक/Mechanical Batch)37 जागा

शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास असला पाहिजे. त्याशिवाय या उमेदवारांने इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन (रेडिओ, पॉवर), मेकॅनिकल या ट्रेडमधील अभियांत्रिकीची पदविका किमान 60 टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी.

वयाची अट –
उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 22 वर्ष दरम्यान असावे. वयोमर्यादेत एसी, एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे

वेतनमान –
29,200 रुपये – 46,600 रुपये + ग्रेड पे असे वेतन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण –
पात्र आणि निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात दलाच्या कोणत्याही कार्यालयात नोकरी करण्याची संधी मिळेल.

शुल्क –
या निवड प्रक्रियेसाठी परिक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही

अर्ज प्रक्रिया –
उमेदवार अर्ज करण्यासाठी https://joinindiancoastguard.gov.in/whyjoin.html या वेबसाइटला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च असेल.

You might also like