Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard Recruitment 2021) नोकरीची संधी चालून आली आहे. असिस्टंट कमांडंटसाठी (Assistant Commandant) 50 जागांवर भरती केली जाणार असून याकरिता इंडियन कोस्ट गार्डने नोटिफिकेशन जारी केलं आहे. पात्र अन् इच्छूक उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज सादर करण्याची मुदत 4 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करू शकतात. इंडियन कोस्टगार्डच्या माहितीनुसार, एकूण असिस्टंट कमांडंटच्या 50 पदांवर भरती होणार आहे. जनरल ड्युटीसाठी 40 जागा भरल्या जाणार आहेत. यात 11 जागा खुल्या, ईडबल्यूएससाठी 3, ओबीसीसाठी 7, एससीसाठी 6 आणि एसटीच्या 13 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता
इंडियन कोस्टगार्डमध्ये जनरल ड्युटी पदावर अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत.
मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावेत.
टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 10 जागांवर भरती होणार आहे.
टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिल्पोमा,
पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्री अँड प्रोडक्शन, आटोमोटिव, किंवा मरिन आकर्किटेक्चर यामधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- Indian Coast Guard Recruitment 2021 | job alert icg recruitment 2021 assistant commandant indian coast guard know about it

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)