12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! परीक्षा न देताच निवड, ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये 260 पदांसाठी भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे लोक 12 वी पास आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन कोस्ट गार्ड(भारतीय सागरी सुरक्षा दल) मध्ये 260 पदांसाठी भरती होणार आहे. जर तुम्ही 12 वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता. joinindiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. यासाठी इच्छुक उमेदवार 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

कशी असणार निवड प्रक्रिया ?
जे लोक 12 वी पास आहेत आणि यासाठी अर्ज करत आहेत असे लोक लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट तसेच मेडिकल स्टँडर्ड टेस्ट देऊ शकतात. इंडियन कोस्ट गार्डच्या या भरतीसाठी 12वीचे गुण ग्राह्य धरले जातील. यातून ज्या उमेदवारांची निवड केली जाईल अशा उमेदावारांना ऑगस्ट 2020 मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पात्रता-
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचं वय किमान 18 आणि कमाल 22 असावं. SC/ST श्रेणीतील अर्जदारांच्या वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC श्रेणीतील अर्जदारांना 3 वर्षांची सूट असणार आहे.

शिक्षणाची अट-
अर्जदारानं कोणत्याही शैक्षणिक बोर्डाची बारावीची परीक्षा 50 टक्क्यांनी पास केलेली असावी. बारावीत त्यानं गणित आणि भौतिकशास्त्राचं शिक्षण घेतलेलं असावं अशी यातील मुख्य अट आहे. मुख्य म्हणजे जे अर्जदार आरक्षित श्रेणीतील आहेत त्यांना 5 टक्के गुणांची सवलत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/