कोस्ट गार्डची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून कोट्यावधीचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद : वृत्तसंस्था – भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई आज (मंगळावर) केली. आजपर्य़ंतच्या केलेल्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातच्या जाखो किनाऱ्याजवळ ही कारवाई करण्यात आली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या अल मदिना या मच्छिमार बोटीतून कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या जवळील समुद्रात हद्दीत गस्त घालण्यास सुरूवात केली. गस्त घालत असताना तटरक्षक दलास पाकिस्तानच्या हद्दीत काही संशयीत बोटी दिसल्या.

तटरक्षक दलाने या बोटींचा पाठलाग करून ताब्यात घेतल्या. बोटींची झडती घेतली असता यामध्ये लपवलेली १९४ ड्रग्जची पाकडीटे सापडली. या पाकिटातील ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात ६०० कोटी रुपये किंमत आहे. तटरक्षक दलाने अटक केलेल्या १३ जणांची चौकशी सरु असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.