इराणच्या कबड्डीतील विजयामागे भारतीय योगदान

जकार्ता :

अठराव्या आशियाई स्पर्धेत इराणने भारतावर विजय मिळवत कबड्डीतील भारताच्या साम्राजाला हादरा दिला . भारताच्या पुरुष संघाला उपांत्य सामन्यात इराणने पराभवाचा धक्का दिला, तर महिला संघाला अंतिम फेरीत इराणच्या महिलांकडून हार पत्करावी लागली. १९९० साली एशियाड स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला आहे . तेव्हापासून आतापर्यंत भारताने कबड्डीत एकहाती आपलं वर्चस्व कायम राखलं होतं.

एशियाडमधील इराणच्या महिला संघाने रचलेल्या इतिहासात एका भारतियाची महत्वाची कामगिरी आहे. त्या म्हणजे इराणच्या महिला संघाच्या प्रशिक्षक शैलजा जिनेंद्रकुमार जैन. इराणच्या महिला संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन ह्या भारतीय आहेत. शैलजा यांचा इराणच्या विजयात मोलाचा वाटा आहे.

शैलजा जैन महाराष्ट्रातील नागपूरच्या आहेत. NSI मध्ये प्रशिक्षक राहिलेल्या २०१४ मध्ये निवृत्त झाल्या. त्यांनतर २०१६ सालात इराणने शैलजा यांना प्रशिक्षकपदाची ऑफर दिली. २०१६ पासून जवळजवळ अडीच वर्ष शैलजा जैन ह्या इराणच्या प्रशिक्षक आहेत.
इराणच्या महिलांना कबड्डीच्या गोष्टींचं प्रशिक्षण देणाऱ्या शैलजा म्हणाल्या, “त्यांना इराणी महिला संघाला खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकवाव्या लागल्या. मात्र इराणच्या महिला खेळाडू तंदुरुस्त असतात, त्यामुळे त्यांनी कबड्डीतले बारकावे लवकर आत्मसात केले.”
शैलजा यांनी इराणी खेळाडूंशी संवाद स्वतः फारसी भाषा आत्मसात केली तसेच इराणी महिला संघाच्या दिनचर्येमध्ये योग व प्राणायम यांचा समावेश केला. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाच्या उजव्या बाजूतल्या कमकुवत बाजू शैलजा जैन यांनी अचुक हेरल्या. त्यानुसार रणनीती आखून इराणच्या संघाला मैदानात उतरवलं व जिंकूनही दिलं.

कबड्डीमध्ये महारथी असणाऱ्या देशाचं एकहाती वर्चस्व मोडून काढत सुवर्णपदक जिंकणं ही सोपी गोष्ट नाही, मात्र इराणने अथक प्रयत्नांच्या जोरावर व भारतीय प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ही गोष्ट शक्य करून दाखवली.

[amazon_link asins=’B01GZPDV2W,B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c408c18-a83c-11e8-a5f7-7d31399af042′]