दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानी नागरिकाला अटक

दुबई : वृत्तसंस्था –   दुबईमध्ये एका भारतीय जोडप्याची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी दुबई पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजतेय. ही घटना 18 जून रोजी घडली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या जोडप्याची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे वृत्त एका गुजराती वृत्तपत्राने दिले आहे.

हिरेन अधिया आणि विधी अधिया असे खून झालेल्या जोडप्याचे नाव आहे. ते दुबईतील अरेबियन रँचेसमध्ये वास्तव्यास होते हिरेन अधिया यांचा शारजा येथे व्यावसाय होता. दरम्यान, दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेले दागिने जप्त केले आहेत. तसेच दुबईतील भारतीय दूतावासालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार हिरेन आणि विधी अधिया यांच्या मित्रांशी, स्थानिक अधिकारी आणि त्यांच्या समजातील काही सदस्यांच्या संपर्कात भारतीय दूतावास आहे. यासंदर्भातील बातमी गुजराती मध्यामामध्ये 19-20 जून रोजी प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान, दोन ते तीन वर्षापासून हे जोडपे दुबईत स्थायिक झाले होते. या दोघांचे नातेवाईक भारतामध्ये आहेत.