‘टीम इंडिया’च्या मॅनेजरला मोदी सरकारला नकार देणे पडणार महागात, मिळणार शिक्षा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि विंडीज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळविण्यात येणार आहे. या मालिकेत भारत विजयासाठी मैदानात उतरणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र या सगळ्यात भारतीय संघासाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे.

भारतीय संघाचे मॅनेजर सुनील सुब्रहमण्यम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारताच्या उच्च अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याचा फटका बीसीसीआयला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे. भारतीय संघाला केंद्र सरकारनं जल संरक्षणा संदर्भात एक छोटीशी जाहिरात करायला सांगितले होते. मात्र यासाठी त्यांनी केंद्र सरकारचा फोन न उचलल्यामुळे गोंधळ उडाला आहे. सुनील सुब्रहमण्यम यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात येणार होती.

कोणतीही मदत नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या मॅनेजरशी ज्यावेळी भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. त्याचबरोबर त्यांनी या जाहिरातीसाठी लागणारी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर या दौऱ्यानंतर भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळण्याची शक्यता  आहे. त्याचबरोबर संपूर्ण स्टाफ देखील बदलण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.

आरोग्यविषयक वृत्त