Indian Cricket Team | ‘या’ 27 वर्षीय गोलंदाजांचे करिअर संपल्यातच होते जमा, तेवढ्यात मिळाली मोठी संधी! कोण आहे ‘हा’ गोलंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडिया (Indian Cricket Team) सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) खेळत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया (Indian Cricket Team) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 टी 20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे.न्यूझीलंडनंतर (New Zealand) टीम इंडिया बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध वनडे आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे. दोन्ही दौऱ्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक विविध खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना विश्रांती देखील देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एका अशा खेळाडूला संधी मिळाली आहे, ज्याची क्रिकेट कारकीर्द जवळजवळ संपल्यातच जमा होती. मात्र आता या खेळाडूची निवड समितीने भारताच्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात निवड केली आहे.

कोण आहे हा खेळाडू?

हा खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा (Indian Cricket Team) चायनामॅन कुलदीप यादव (Kuldeep Yadav). कुलदीप यादवची निवड समितीने आता भारताच्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात निवड केली आहे. काही काळापूर्वीपर्यंत निवडकर्ते कुलदीप यादवकडे सतत दुर्लक्ष करत होते आणि त्याला टीम इंडियात संधी देत नव्हते. मात्र, आता कुलदीप यादवचे नशीब बदलले असून निवड समितीने टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड केली आहे.टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) फ्लॉप शोनंतर कुलदीप यादवसारख्या खतरनाक चायनामॅन गोलंदाजाचा तिन्ही संघात समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्रिक घेण्याचा विक्रम कुलदीप यादवच्या नावावर आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका सामना (भारतीय वेळेनुसार):

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिका

पहिला टी-20सामना, 18नोव्हेंबर, दुपारी 12.00 वाजता, वेलिंग्टन
दुसरा टी-20सामना, 20नोव्हेंबर, दुपारी 12.00 वाजता, माउंट मौनगानुई
तिसरा टी-20 सामना, 22नोव्हेंबर दुपारी 12.00 वाजता, नेपियर

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार) (Hardik Pandya (captain), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टीरक्षक) Rishabh Pant (vice-captain, wicketkeeper), शुभमन गिल (Shubman Gill), इशान किशन (Ishan Kishan) , दीपक हुडा (Deepak Hooda) , सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), श्रेयस अय्यर Shreyas Iyer, संजू सॅमसन (यष्टीरक्षक) Sanju Samson (wicketkeeper), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) , युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), हर्षल पटेल (Arshdeep Singh), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) , उमरान मलिक (Umran Malik)

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय सामना, 25 नोव्हेंबर, सकाळी 7.00 वाजता, ऑकलंड
दुसरा एकदिवसीय सामना, 27 नोव्हेंबर, सकाळी 7.00 वाजता, हॅमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना, 30 नोव्हेंबर, सकाळी 7.00 वाजता, क्राइस्टचर्च

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:

शिखर धवन (कर्णधार) (Shikhar Dhawan (Captain), ऋषभ पंत Rishabh Pant (vice-captain, wicketkeeper), शुभमन गिल (Shubman Gill), इशान किशन (Ishan Kishan) , दीपक हुडा (Deepak Hooda) , सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), श्रेयस अय्यर Shreyas Iyer, संजू सॅमसन (यष्टीरक्षक) Sanju Samson (wicketkeeper), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) , युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), उमरान मलिक(Umran Malik) ,शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), शाहबाज अहमद(Shahbaz Ahmed) ,दीपक चहर (Deepak Chahar), कुलदीप सेन (Kuldeep Sen,

भारत विरुद्ध बांगलादेश मालिका सामना (भारतीय वेळ):

भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय सामना, 4 डिसेंबर, दुपारी 12.30 वाजता, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना, 7 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना, 10 डिसेंबर, दुपारी 12.30 वाजता, ढाका

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार) Rohit Sharma (captain), केएल राहुल (उपकर्णधार) KL Rahul (vice-captain), शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली (Virat Kohli), रजत पाटीदार (Rajat Patidar), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), ऋषभ पंत (Rishabh Pant), इशान किशन (Ishan Kishan), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल(Akshar Patel), वॉशिंग्टन सुंदर(Washington Sundar), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), मोहम्मद शमी(Mohammad Shami), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), दीपक चहर(Deepak Chahar), यश दयाल (Yash Dayal)

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना, 14-18 डिसेंबर, सकाळी 9.30, चितगाव
दुसरा कसोटी सामना, 22-26 डिसेंबर, सकाळी 9.30, ढाका

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार) Rohit Sharma (captain), केएल राहुल (उपकर्णधार) KL Rahul (vice-captain), शुभमन गिल (Shubman Gill), विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) , ऋषभ पंत ऋषभ पंत (Rishabh Pant), केएस भरत (KS Bharat), रविचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल(Akshar Patel), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), मोहम्मद शमी(Mohammad Shami), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) उमेश यादव (Umesh Yadav), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)

Web Title :-  Indian Cricket Team | kuldeep yadav chinaman bowler got a chance in team india for new zealand and bangladesh tour in indian cricket team

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Leader Sandeep Deshpande | किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप, मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले…