‘शौकीन’ हार्दिक पंड्याकडं ‘इतक्या’ कोटीची ‘गाडी’ अन् ‘घड्याळ’ ही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्या सध्या त्याच्या खाजगी लाइफमुळे चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. तेव्हापासून हार्दिक चर्चेमध्ये आला आहे.

हार्दिकच्या स्टाईलवर चाहते नेहमीच फिदा असतात. हार्दिकला महागड्या वस्तू वापरण्याचा छंद आहे. त्यामुळे देखील तो चर्चेत येत असतो. बऱ्याचवेळा हार्दिक महागडे शूज, सनग्लासेस, स्नीकर आणि जॅकेटमध्ये दिसतो. हल्ली एअरपोर्टवर पुन्हा एकदा हार्दिकचा असा लूक दिसून आला आहे. त्याने घातलेल्या महागड्या वस्तूची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक मध्यंतरी रुग्णालयात होता. सर्जरीनंतर रुग्णालयातून त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये त्याने घड्याळ घातले आहे. त्याच्या हातात असलेल्या घड्याळाची किंमत 80 लाख रुपये आहे. हार्दिकने फिलिपची पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G हे घड्याळ घातले होते. भारतात हे घड्याळ मिळत नसल्यामुळे त्याची किंमत एक कोटी १० लाख आहे.

View this post on Instagram

Red-dey. Set. Go. 🔴

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

त्याचबरोबर त्याने परिधान केलेल्या बुटाची किंमत एक लाख रुपये आहे. हार्दिकच्या पायात क्रिसचियन लुबाउटिनचे लु स्पाइक्स शूज असतात. ब्लॅक काफफिश लेदरच्या या बूटाची किंमत विदेशात 70 हजार आहे. भारतात हा बूट आयात केला जातो त्यामुळे त्याची किंमत 1 लाख रुपये आहे.

हार्दिकला हिरे खूप आवडतात. विश्वचषक होण्यापुर्वी त्याने खास डायमंड बॅट आणि बॉल लॉकेट बनवले होते. हार्दिक पंड्याकडे लॅंबोर्गिनी हुरकॅनही गाडी आहे. या गाडीची किंमत भारतात 3.58 कोटी आहे. मिळालेल्या माहितीनुसार हार्दिककडे विराट आणि धोनीपेक्षाही महागडी गाडी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like