माजी कर्णधार कपिल देव यांना रुग्णालयातून मिळाली सुट्टी, फोटो आला समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा पहिला विश्वचषक जिंकणारा कॅप्टन कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हृदयविकाराच्या तक्रारीनंतर त्याला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 61 वर्षीय कपिल यांची इमर्जन्सी कोरोनरी अँजिओप्लास्टी झाली. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कपिल देव यांना आज (रविवारी) दुपारनंतर डिस्चार्ज देण्यात आला. ते आधीपासूनच चांगल्या स्थितीत आहे आणि लवकरच ते आपला दैनंदिन कामकाज सुरू करू शकतील. कपिल देवला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यापूर्वी माजी भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्माने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता.

फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हार्ट डिसीज विभागाचे संचालक अतुल माथूरने त्यांच्यावर आपत्कालीन कोरोनरी अँजिओप्लास्टी केली. 24 ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रियेनंतर त्यांचा पहिला फोटो माजी भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्माने शेअर केला होता. या चित्रात तो सर्वकाही ठीक असल्याचे दर्शविताना दिसला.

क्रिकेटच्या इतिहासातील कपिल देव हे एकमेव खेळाडू आहे, ज्यांनी आपल्या नावावर 400 पेक्षा जास्त (434) विकेट्स घेत कसोटी सामन्यांमध्ये 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात प्रथमच भारताने 1983 मध्ये विश्वचषक जिंकला.

You might also like