कोरोना लस घेतल्यानंतर ‘या’ कारणामुळं भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादव ‘गोत्यात’ येण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात 1 मेपासून तिस-या टप्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूं विराट कोहली, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, कुलदीप यादव यांनी लसीचा पहिला डोस नुकतान घेतला आहे. दरम्यान भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला लस घेणे महागात पडणार आहे. कुलदीपने लस घेण्यासाठी अॅपद्वारे बुकींग केली होती. परंतू त्याने ही लस लसीकरण केंद्रावर जाऊन न घेता त्याच्या गेस्ट हाऊसवरच घेतली आहे. त्यामुळे या VIP ट्रिटमेंटची आता चर्चा सुरू झाली असून कानपूर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

इंग्लंड दौ-यातून वगळल्यानंर कुलदीप यादवने निराश होत प्रतिक्रिया दिली आहे. मैदानात यष्टीमागून महेंद्रसिंग धोनीचे मार्गदर्शन मी मिस करतो. त्याच्याकडे अपार अनुभव होता. तो सतत यष्टीमागून मोठ्या आवाजात माझ्यासारख्या गोलंदाजाला मार्गदर्शन करत असत. तर कधी मला माही भाईच्या मार्गदर्शनाची आठवण येते. ऋषभ पंतने आता धोनीचे स्थान घेतले. तो जितका खेळला, तितका तो भविष्यात अधिक इनपुट देण्यास सक्षम असतो. कुलदीपने 2019 मध्ये 23 एकदिवसीय सामने खेळले. 2020 आणि 2021 मध्ये त्याने आतापर्यंत फक्त 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कुलदीप पुढे म्हणाला, जेव्हा धोनी संघात होता, त्यावेळी मी व युजवेंद्र चहल खेळत होतो. माही भाई गेल्याने चहल अन् मी एकत्र खेळलो नाही. मी फक्त 10 सामने खेळलो. एकदा मी हॅटट्रिकही घेतली. माझ्या कामगिरीकडे पाहाल, तर त्यात काही उणीव जाणवणार नाही. आयपीएलमध्ये यंदा एकाही सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीपने मत व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध फक्त 1 कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाल्याचे कुलदीपने म्हटले आहे.