home page top 1

कॅप्टन विराट कोहलीच्या ‘GF’ची लिस्ट व्हायरल ; ‘या’ बड्या अभिनेत्रीच्याही नावाचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्डकप खेळत आहे. परंतु अफेअरच्या बाबतीत विराट कोहलीचे नाव अनेकदा चर्चेत राहिले आहे. वर्ल्डकप सोबत आता विराटच्या अफेअरबाबतही चर्चा सुरु आहे असे दिसत आहे. विराटने 11 डिसेंबर 2017 मध्ये बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. परंतु अनुष्काच्या आधी विराट कोहलीचे अनेक अफेअर्स झाले आहेत. याविषयी क्वचितच कोणाला माहिती असेल.

1) साक्षी अग्रवाल- तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री साक्षी अग्रवालचे विराट कोहलीसोबत अफेअर होते. तिने आपल्या मॉडेलिंगची सुरुवात बंगळुरु मधून केली होती. तिथूनच विराट आणि साक्षीच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. परंतु हे नाते जास्त दिवस चालू शकले नाही.

image.png

2) सारा जेन डियास- भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल सारा डियास आणि विराट कोहली यांच्या प्रेमकहाणीलाही लवकरच फुल स्टॉप लागला. त्यांचेही नाते जास्त दिवस टिकू शकले नाही. लवकरच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं दिसून आलं. सारा आणि विराट अनेकदा पार्टीमध्ये एकत्र दिसले आहेत. परंतु ते मात्र एकमेकांचे मित्र असल्याचे सांगत असत.

image.png

3) इजाबेल लेइत– इजाबेल बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल आहे. इजाबेलने बॉलिवूडमधील अनेक सिनेमात काम केले आहे. विराट आणि इजाबेल यांचं जवळपास दोन वर्षे रिलेशन होतं. परंतु पुढे फार काळ हे नाते टिकले नाही.

image.png

4) तमन्ना भाटिया- साऊथ सिनेमातील आणि बाहुबली मधील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांनी एका अॅड फिल्ममध्ये काम केलं होतं. यानंतर असे वृत्त समोर आले होते की, दोघांमध्ये काहीतरी आहे. परंतु दोघांनी कधीच आपले नाते जाहीर केले नाही.

Loading...
You might also like