युजवेंद्र चहलची भावी पत्नी धनश्री वर्माचा ‘दारु बदनाम’ गाण्यावर जबरदस्त डान्स (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युजवेंद्र चहल याने नुकताच साखरपुडा केला. चहलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुड्याची माहिती दिली होती. चहल डॉ. धनश्री वर्माशी लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. साखरपुड्यानंतर दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. धनश्री वर्मा प्रसिद्ध युट्युबर देखील आहे. तिच्या नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट असतात. सोशल मीडियावर ती नेहमी तिच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे व्हिडीओ पाहून तिचे चाहते अक्षरश: वेडे होतात. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दारु बदनामवर ती डान्स करताना दिसत आहे. या डान्समधील तिची एनर्जी जबरदस्त आहे. डान्स दरम्यान तिने केलेले मुव्हज पाहून चाहते नक्कीच घायाळ होतील. व्हिडीओमध्ये धनश्रीने सफेद रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाच्या शॉट्र्समध्ये दिसतेय. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तिच्या डान्सवर चाहते प्रतिक्रिया देत आहे.

धनश्रीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. हा डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी खूप वाट पहात होते. धनश्री नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. युजवेंद्र बद्दल सांगायचं झालं तर तो आयपीएलच्या 13 व्या सीझनसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या जर्सीमध्ये दिसण्यासाठी पूर्ण तयार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी आयपीएल सुरु होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत.