भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, सोशल मिडियावर फोटो केले शेअर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा मंगळवारी (दि. 22) विवाहसोहळा पार पडला. धनश्री वर्मा हिच्याबरोबर त्याने सप्तपदी घेतली. चहल याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

चहल आणि धनश्री यांंचे हिंदू पद्धतीने गुरगाव येथील कर्मा लेक रिसॉर्ट येथे लग्न केले. यावेळी चहल आणि धनश्री यांच्या कपड्यांच्या रंगांमध्येही यावेळी सारखेपणा दिसला. चहलने धनश्रीला लॉकडाऊन सुरु असताना प्रपोज केले होते . त्यानंतर या दोघांनी काही दिवसांमध्येच साखरपुडा केला होता. मंगळवारी अखेर या दोघांनी लग्न केल्याचे दिसून आले. धनश्री ही चांगली डान्सर आहे आणि तिच्या या कौशल्यावरच चहल फिदा झाला होता. त्यामुळेच चहलने धश्रीला लग्नाबाबत विचारले होते आणि त्यानंतर धनश्रीने चहलला होकार दिला होता.

आयपीएलसाठी युएईला जाण्यापूर्वी चहलने धनश्रीबरोबर साखरपुडा केला होता. त्यानंतर चहल हा आयपीएल खेळण्यासाठी युएईला गेला होता. त्यानंतर चहल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तिथे वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळला होता. त्यानंतर ही मालिका संपवून मायदेशात परतल्यावर चहलने धनश्रीबरोबर आज लग्न केल्याचे पाहायला मिळाले.