लंडनच्या ‘फॅशन’ वीकमध्ये दिसला भारतीय संस्कृतीचा ‘जलवा’, परदेशात झालं देशाचं ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विदेशात नेहमीच भारतीय संस्कृतीला पसंत केले जाते. लंडनच्या सर्वात मोठ्या फॅशन शो मध्ये असेच काही पहायला मिळाले आहे. कारण तेथे एका विदेशी मॉडेल्सने रॅम्प वर भारतीय साडी परिधान करून वॉक केले. लंडनमध्ये भारतीय उच्चायोगाने एक कॅटवॉकचे आयोजन केले होते, ज्यामध्ये त्यांनी सुमारे १७ वेगवेगळ्या साड्यांचे लोकांसमोर प्रदर्शन केल्या. यामध्ये उत्तर भारतातील काश्मिरी आणि फुलकारी, पश्चिम बंगालमधील कांथा आणि बालूचरी, गुजरातमधील घरचोला, महाराष्ट्रातील पैठणी, तमिळनाडूतील कांजीवरम आणि केरळमधील कसावु साड्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या आयोजनानंतर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा एक व्हिडिओ संदेश समोर आला ज्यामध्ये त्या म्हणाल्या, ‘आपल्याकडे अनेक प्रकारचे भारतीय वस्त्रोद्योग उपलब्ध आहेत. साडी हे केवळ फॅब्रिकच नाही तर आमच्या वस्त्रोद्योगाच्या वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतिबिंब आहे, आणि ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे’. या समारंभात ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लॉर्ड तारिक अहमद यांच्यापासून इस्त्रायली राजदूत मार्क रेगेव्ह आणि ब्रिटनमधील बांगलादेशी उच्चायुक्त यांचा देखील समावेश होता.

ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्त यांनी माहिती दिली की या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक वारसा दर्शविण्यासाठी सर्व लोकांकडून साड्या घेतल्या गेल्या आहेत. त्या लवकरच परत देखील केल्या जातील. त्यांनी सांगितले की हा सोहळा त्या कारागीर आणि त्यांचे उत्पादन करणाऱ्या विणकर यांच्या नावावर होता. लंडन फॅशन वीकमधील ‘इंडिया डे’ चा कार्यक्रम शुक्रवारी सुरू झाला, जो मंगळवारी संपेल.