Indian Currency | अचानक बाजारातून का गायब होत आहेत 2,000 रुपयांच्या नोटा, सरकारने सांगितले ‘हे’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Currency | नोटाबंदीनंतर, जेव्हा नवीन नोटा बाजारात आल्या तेव्हा 2,000 रुपयांची नोट सर्वाधिक चर्चेत होती. या गुलाबी रंगाच्या नोटांनी सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली होती. अशा नोटा मिळविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. त्यावेळी ATM मध्येही नवीन नोटांसाठी वेगळी व्यवस्था करावी लागली होती. (Indian Currency)

 

पण आता अचानक 2000 रुपयांच्या नोटा बाजारात क्वचितच दिसत आहेत. बाजारातून या नोटा अचानक गायब होण्यामागचे रहस्य काय आहे ते आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत.

 

सरकारने लोकसभेत सांगितले की 2020-21 या आर्थिक वर्षात 2,000 रुपयांची नवीन नोट छापण्यात आलेली नाही. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये एक लाख नोटांपैकी 2,000 रुपयांच्या नोटांची संख्या 32910 होती, जी मार्च 2021 पर्यंत 24510 पर्यंत कमी झाली. (Indian Currency)

 

जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण
31 मार्च 2021 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 2,000 आणि 500 रुपयांच्या नोटा 85 टक्के होत्या. त्याच वेळी, 31 मार्च 2020 रोजी हा आकडा 83 टक्के होता. म्हणजेच चलनात असलेल्या 500 च्या नोटांची संख्या वाढली आहे असे मानले जाऊ शकते.

 

याचे एक कारण हे देखील मानले जात आहे की 2000 रुपयांच्या नोटांमुळे छोट्या व्यवहारात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे 500 आणि 100 च्या नोटांची संख्या 2,000 रुपयांच्या नोटांपेक्षा जास्त झाली आहे.

ATM मधून हटवले 2000 च्या नोटांचे बॉक्स
लोकांना छोट्या व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एटीएम आणि बँकांच्या कॅश विंडोमधून केवळ 500 रुपयांच्या नोटा जास्त मिळत आहेत. ATM मध्ये हळूहळू 2000 च्या नोटेचा बॉक्सच्या ठिकाणी 500 च्या नोटांचे बॉक्स लावले जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

 

एवढेच नाही तर एटीएममध्ये नोटा टाकणार्‍या कंपन्यांना 2000 रुपयांच्या नोटा कमी दिल्या जात आहेत.

 

Web Title :- Indian Currency | indian currency why are rs 2000 notes suddenly disappearing from the market government told reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nawab Malik Net Worth | ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

 

EPFO | 6 कोटीपेक्षा जास्त कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! ईपीएफ क्लेमसाठी ई-नॉमिनेशनचे बंधन संपले

 

Kiara Advani Viral Photo | कियाराचे साडीतील फोटो पुन्हा एकदा चर्चेत, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..