Video : इमरान खानच्या संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावर भारतानं टाकला ‘बहिष्कार’, सुरु होताच केलं वॉकआउट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आज यूएनजीए (संयुक्त राष्ट्र महासभा) येथे भाषण सुरू केले तेव्हा भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य सभागृहातून बाहेर आले. पाकिस्तानच्या वतीने भारताविरोधी वक्तव्य आणि काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याच्या मुद्द्यावर भारतीय शिष्टमंडळाने इमरान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. कोरोना काळात या वेळी संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन व्हर्चुअल पद्धतीने होत आहे.

आपल्या भाषणाची सुरुवात करताच इमरान खान यांनी खोटं बोलणं सुरु केलं. ते म्हणाले, ‘भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी गांधी आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना मागे ठेवण्याचा आरएसएस प्रयत्न करीत आहे.’ यूएन मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी इमरान खान यांच्या विधानावर म्हटले की 75 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे विधान मुत्सद्दीदृष्ट्या निकृष्ट पातळीचे होते.

ते म्हणाले की, इमरान खान यांच्या विधानात खोटे आरोप करणे, वैयक्तिक हल्ले करणे आणि इथल्या अल्पसंख्यांकांची स्थिती न बघता भारतावर भाष्य करणे या गोष्टींचा समावेश आहे. राईट टू रिप्लायमध्ये याचे उत्तर देण्यात येईल.