Indian Digital Currency | भारताची असेल स्वतःची क्रिप्टोकरन्सी ! RBI पुढील वर्षी आणू शकते इंडियाची डिजिटल करन्सी

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – Indian Digital Currency | भारतीय रिझर्व्ह (RBI) पुढील वर्षी आपली डिजिटल करन्सी (Indian Digital Currency) लाँच करू शकते. यासाठी आरबीआय सातत्याने काम करत आहे आणि यासाठी एक प्लान सुद्धा बनवला आहे. रॉयटर्सने एका स्थानिक वृत्तपत्राचा संदर्भ देत वृत्त दिले आहे की, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ‘बँकिंग अँड इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह’मधील केंद्रीय बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याची पूर्ण शक्यता वर्तवली आहे (RBI may brings India’s digital currency in next year).

आरबीआयची पायलट डिजिटल करन्सी

आरबीआयमध्ये पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य महा व्यवस्थापक पी. वासुदेवन ( Chief General Manager, Payments and Settlement, P. Vasudevan) यांच्या संदर्भाने बिझनेस स्टँडर्डने लिहिले आहे की, पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पायलट आधारावर डिजिटल करन्सी (Indian Digital Currency) जारी केली जाऊ शकते. यासाठी आम्ही खुप आनंदी आहोत.

कशी असेल आरबीआयची डिजिटल करन्सी?

आरबीआय पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDCs) लाँच करू शकते. ही डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी असेल. पण ही भारताच्या मुळ चलनाचेच डिजिटल रूप असेल म्हणजे ती डिजिटल रुपया असेल.

यापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत CBDCs च्या सॉफ्ट लाँचची शक्यता वर्तवली होती. मात्र, यासाठी त्यांनी कोणतेही टाइम लिमिट सांगितले नव्हते.

लाँचपूर्वी सुरू आहे यावर विचार

वासुदेवन यांनी म्हटले की, भारताची डिजिटल करन्सी लाँच (India’s digital currency) करणे इतके सोपे नाही आणि हे उद्यापासून ताबडतोब लोकांच्या जीवनाचा भाग बनू शकत नाही. यामुळे घाई केली जाणार नाही. तिच्या लाँच पूर्वी अनेक मुद्द्यांवर विचार सुरू आहे. या करन्सीची भूमिका काय असेल, ती कशी लागू करावी, तिला मान्यता देण्याची पद्धत काय असेल, तिची माहिती कशी राहिल, ती घाऊक व्यवहारासाठी उपयोगी येईल की, किरकोळ व्यवहारात सुद्धा वापरता येऊ शकते.

Web Title : Indian Digital Currency | rbi may launch indian digital currency or cryptocurrency on pilot basis q1 of next year reserve bank of india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ