Indian Doctors Premier League T20 Cricket | पहिली ‘इंडियन डॉक्टर्स प्रिमिअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा; दिल्ली चॅम्पियन संघाला विजेतेपद !!

पुणे : यंग डॉक्टर्स लीग फाऊंडेशन (वायडीएल) तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स प्रिमिअर लीग’ टी-२० क्रिकेट (Indian Doctors Premier League T20 Cricket) स्पर्धेत दिल्ली चॅम्पियन संघाने मुंबईच्या स्पार्टन्स् युनायटेड संघाचा डीएलएस मेथडनुसार एका धावेनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Indian Doctors Premier League T20 Cricket)

नेहरू स्टेडियम मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन्स् युनायटेड संघाने १२६ धावा धावफलकावर लावल्या. आनंद अगरोया (२९ धावा) आणि अजित कालेवर (१६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. दिल्ली संघाच्या अनिरूद्ध सक्सेना (२-१७) आणि प्रशांत बालू (२-२५) यांनची अचूक गोलंदाजी केली. दिल्ली चॅम्पियन संघाने या आव्हानाचा पाठलाग सुरू केला. दिल्ली संघाने १३ षटकात ५ गडी गमावून ८५ धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. डीएलएस मेथडनुसार दिल्ली संघाने एका धावेनी विजय संपादन केला. जयदीप बझाड (२१ धावा) आणि प्रशांत बालू (२५ धावा) यांनी धावा जमविल्या आणि संघाचा विजय निश्‍चित केला.

पुण्यातील डॉक्टरांच्या आणि सहाशेहून अधिक ऍलोपॅथी डॉक्टर सभासद वायडीएल संस्थेने या वर्षी अखिल भारतीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली होती.
ऍलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, दंतचिकित्सा आणि होमिओपॅथी अशा सर्वच वैद्यकीय शाखेच्या डॉक्टरांचा समावेश होता. स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील-शहरांतील १६ संघ सहभागी झाले होते. पुणे आणि मुंबई येथील प्रत्येकी ४ संघ, नाशिक, ठाणे, वीटा, कोल्हापूर व औरंगाबाद येथील प्रत्येकी एक संघ सहभागी झाला होता. तसेच अहमदाबाद, दिल्ली, उदयपूर व त्रावणकोर येथून संघातील खेळाडू सहभागी झाले होते. (Indian Doctors Premier League T20 Cricket)

स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक,
पुणे मुख्य अग्निशामकदल प्रमुख श्री. पोटफोडे, एमक्युअर फार्मा पुणेचे संचालक नमिता थापर,
स्किन अँड केअर लेझर क्लिनिकचे नितीन जैन, समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते करण्यात आले.

विजेत्या दिल्ली चॅम्पियन संघाला करंडक आणि १ लाख ११ हजार रूपये तर उपविजेत्या स्पार्टन्स् युनायटेड संघाला ६६,६६६ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू डॉ. अजित कालवार (स्पार्टन्स्);
सर्वोत्कृष्ट फलंदाज डॉ. प्रसन्ना भट (स्पार्टन्स्); सर्वोत्कृष्ट गोलंदाज डॉ. विनय सागळे यांना करंडक आणि
२५ हजार रूपये देण्यात आले. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ. साजिद रावत (ठाणे सुपर्ब) आणि सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक
डॉ. मेघ पटेल यांना करंडक आणि १५ हजार रूपये देण्यात आले.

Advt.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
स्पार्टन्स् युनायटेडः १९.५ षटकात १० गडी बाद १२६ धावा (आनंद अगरोया २९, अजित कालेवर १६, साजन शेट्टी १४,
अनिरूद्ध सक्सेना २-१७, प्रशांत बालू २-२५) डीएलएस मेथडनुसार पराभूत वि. दिल्ली चॅम्पियनः १३ षटकात ५ गडी
बाद ८५ धावा (जयदीप बझाड २१, प्रशांत बालू २५, अजित कालेवर २-१५, विनय सांगळे २-२८); सामनावीरः प्रशांत बालू;

Web Title :-  Indian Doctors Premier League T20 Cricket | First ‘Indian Doctors Premier League’ T20 Cricket Tournament; Delhi Champion Team Winner !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे चंद्रकांतदादांचे ते विधान चुकीचे’, भाजपने स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | ‘बाळासाहेबांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी केली नव्हती’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; शिंदे गटाला दिलं थेट आव्हान