Flipkart acquires Walmart India : भारतीय कंपनी फ्लिपकार्टनं खरेदी केली वॉलमार्ट इंडिया, लाँच करणार ‘फिल्पकार्ट होलसेल’

नवी दिल्ली : भारतातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ग्रुपने वॉलमार्ट इंडिया खरेदी केली आहे. फ्लिपकार्टने वॉलमार्ट इंडियाची 100 टक्के भागीदारी मिळवली आहे.या यासोबतच फ्लिपकार्ट नवीन डिजिटल मार्केटप्लेस फ्लिपकार्ट होलसेल सुद्धा घेऊन येत आहे. फ्लिपकार्ट यामुळे वॉलमार्ट इंडियाच्या मजबूत होलसेल क्षमतांचा फायदा घेऊ शकणार आहे आणि किराणा व एमएसएमई ग्रोथ वाढवू शकेल. सोबतच या पावलामुळे कंपनीच्या किराणा व्यवसायाला सुद्धा मजबूती मिळेल.

फ्लिपकार्ट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कल्याण कृष्णमूर्ती यांनी म्हटले की, फ्लिपकार्ट होलसेलच्या लाँचिंगसोबतच आम्ही टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक्स आणि देशभरात छोट्या व्यापार्‍यांना फायनान्स करण्यात आमची क्षमता वाढवू.

फ्लिपकार्ट होलसेल युनिट ऑगस्टमध्ये लाँच होईल आणि यामध्ये सर्वप्रथम ग्रोसरी आणि फॅशन कॅटेगरीजसाठी सेवा असतील. वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अग्रवाल कंपनीसोबत राहणार आहेत, यानंतर ते वॉलमार्टमध्ये एक अन्य जबाबदारी सांभाळतील.

सुमारे दोन वर्षांपूर्वी वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये 16 अरब डॉलरमध्ये 77 टक्के भागीदारी खरेदी केली होती. आता फ्लिपकार्टने वॉलमार्ट इंडिया खरेदी केली आहे. कंपनीने हा सौदा अशावेळी केला आहे, जेव्हा रिलायन्सचे जियोमार्ट देशाच्या ई-कॉमर्स सेक्टरमध्ये वेगाने पुढे सरकत आहे. फ्लिपकार्ट होलसेल लाँच झाल्यानंतर कंपनीची जियोमार्ट, उडान, मेट्रो कॅश अँड कॅरी आणि अमेझॉनच्या बी2बी डिव्हिजनशी थेट स्पर्धा होईल.

कृष्णामूर्ती म्हणाले, वॉलमार्ट इंडिया खरेदी केल्याने घाऊक व्यापारात एक मजबूत टॅलेंट पूल जोडला गेला आहे, जो किराणा आणि एमएसएमईच्या गरजांना पूर्ण करण्यात आमच्या स्थितीला मजबूत करेल.