‘नामशेष’ झालेल्या प्रजातीच्या ‘इंडियन एग ईटर’ सापाचे रेस्क्यू, खातो फक्त चिमणीची अंडी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    मध्य प्रदेशातील खारगोन येथे नामशेष झालेल्या प्रजातींचा अंडी खाणारा ( इंडियन एग ईटर) साप आढळला आहे. वनविभागाच्या अनुसूची एक मध्ये या सापाचे स्थान आहे. हा साप मध्य प्रदेशात दुसऱ्यादा सापडला. आशियामध्ये केवळ हाच साप आहे, ज्याचा आहार चिमण्यांची अंडी आहे. जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर मंडलेश्वर सब जेलजवळील त्रिभुवनसिंग तोमर यांच्या घरी साप आढळल्याची बातमी ‘थँक यू नेचर’ च्या पथकाला मिळाली. टीमचे सदस्य अजय वर्मा आणि शिवम सेन तातडीने तिथे पोहोचले. या पथकाच्या सदस्यांनी या सापाची ओळख इंडियन एग ईटर म्हणून केली.

सापाला रेस्क्यू करून वन अधिकारी विधि सिरोलिया यांना कळविण्यात आले आणि त्याला वनविभागाच्या कार्यालयात आणले, जेथे रेंजर सिरोलियाने प्रामुख्याने सापाची प्रजाती इंडियन एग ईटर असल्याची पुष्टी केली. रेंजरने सांगितले की, हा साप क्वचितच पाहायला मिळतो. या क्षेत्रात प्रथमच सापडला, ज्यामुळे याबद्दल फारशी माहिती नाही. जर साप सापडला तर तो तीव्र अभ्यासाचा विषय आहे. मंडलेश्वरमध्ये सापडलेल्या सापाची लांबी साडे 25 इंच आहे. हा प्रौढ आहे. अशियामध्ये केवळ हाच साप अंडी खाणारा आहे.

थँक यू नेचरचे सुशील तारा यांनी सांगितले की, हा साप हा आशियातील एकमेव आहे, ज्याचा आहार फक्त चिमणीची अंडी आहे. हे अंडी सोडून काही खात नाही. यामुळे त्याला अंडी खाणारे म्हणतात. बर्‍याचदा हा साप जंगलात आढळतो. नैसर्गिक वस्ती कमी झाल्यामुळे वन्यजीव निवासी भागात येतात. विशेष बाब म्हणजे हा साप मध्य प्रदेशात दुसर्‍यांदा अधिकृतपणे सापडला. यापूर्वी हा साप मुरैना येथे सापडला होता.