‘या’ भारतीय कुटूंबाने ‘बाली’ येथे फिरण्यासाठी गेल्यानंतर चक्‍क ‘इज्जत’च घालवली (व्हिडीओ)

बाली (इंडोनेशिया) : वृत्तसंस्था – भारतातील एक परिवार सुट्टी घालवण्यासाठी इंडोनेशिया येथील बाली येथे गेले होते. मात्र, या परिवाराने असे काही केले की त्यामुळे त्यांना माफी मागण्याची वेळ आली. फिरण्यासाठी गेलेले हे कुटुंब बाली येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल सोडताना कुटुंबातील काही महिलांनी हॉटेलमधील रुममधून काही सामान चोरले. हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी सामानाची तपासणी केली त्यावेळी सामान चोरल्याचे आढळून आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतातील एक कुटुंब बाली येथे फिरण्यासाठी गेले होते. बाली येथील एका हॉटेलमध्ये हे कुटुंब थांबले होते. हॉटेलची खोली सोडताना या कुटुंबातील काही महिलांनी हॉटेलच्या रुममधील हेअर ड्रायर, साबणाचा डबा, आरसा, हेंगर, सजावटीचे सामान इत्यादी हॉटेलच्या रुममधून चोरले. हॉटेल प्रशासनाला संशय आल्याने त्यांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली. त्यावेळी चोरलेले सामान कर्मचाऱ्यांना आढळून आले. भारतीय कुटुंबाचा लाजविणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हॉटेल कर्मचारी सामानाची झडती घेत आहेत. सामानाची झडती घेत असाताना त्यांनी चोरलेल्या वस्तू बाहेर काढताना दिसत आहेत. परिवारातील एक महिला हॉटेल कर्मचाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हि महिला हॉटेल कर्मचाऱ्याकडे माफी मागताना दिसत आहे. तसेच तुमची नुकसान भरपाई आम्ही देण्यास तयार आहोत आम्हाला सोडा, आमच्या विमानाची वेळ होत असल्याची विनवणी महिला करत आहे.

व्हिडिओच्या शेवटी परिवारातील एक व्यक्ती हॉटेल कर्मचाऱ्याकडे माफी मागत पैसे देण्यास तयार असल्याचे सांगत आहे. तसेच मी तुम्हाला ५० लाख रुपयांचा माल देतो. या वस्तूंचे मी काय करणार, जाऊ द्या सोडून द्या अशी विनंती करत आहे. तर हे सामान मुलांनी बॅगेत ठेवले असून त्यांना माहित नाही की असे करणे चुकीचे आहे, आम्हाला माफ करा अशी विनंती दुसरी महिला करत आहे.

आम्हाला माहित आहे असे करणे चुकीचे आहे. तुमच्याकडे पैसे असतील मात्र तुम्ही जे काही केले आहेत योग्य नाही, असे उत्तर हॉटेल कर्मचाऱ्याने संबंधीत परिवाराला दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. तर प्रसिद्ध लेखीका शोभा डे यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर हे लाजिरवाणे असल्याचे ट्विट करून आपली प्रतिक्रीया दिली. तर टीव्ही कलाकार मिनी माथुर हिने देखील या प्रकाराबाबद आपला संताप व्यक्त केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like