ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या ‘या’ गोलंदाजावर दुःखाचा डोंगर, वडिलांचे।झाले निधन

पोलीसमामा ऑनलाईनः – टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झालेला जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजवर ( India’s right-arm fast bowler Mohammed) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिराजचे वडील मोहम्मद घौस (वय 53) यांचे हैदराबाद येथे प्रदीर्घ आजाराने निधन( Siraj’s ailing father Mohammed Ghouse has passed away) झाले आहे. सिडनीत सराव करत असताना सिराजला आपल्या वडिलांच्या निधनाविषयी माहिती देण्यात आली.

माझे बाबा नेहमी म्हणायचे की माझा मुलगा एक दिवस देशाचे नाव उज्वल करेल. आता मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक कठोर मेहनत घेणार आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी रिक्षा चालवत अनेक कष्ट केले आहेत. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार मी गमावला. माझ्यासाठी ही खरेच धक्कादायक गोष्ट आहे. मला देशाकडून खेळताना पाहणे हे त्यांचे स्वप्न होते.

सिराज सिडनीवरुन Sportstar संकेतस्थळाशी बोलत होता. 2016-17 च्या रणजी हंगामात हैदराबादकडून खेळताना सिराजने 41 बळी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर सिराजला आयपीएलमध्ये RCB च्या संघाकडून संधी मिळाली. तेराव्या हंगामात सिराजने RCB कडून खेळताना आश्वासक मारा केला होता.