खुशखबर ! सतत वाढतोय देशाचा परकीय चलनसाठा, सुवर्ण साठ्यात सुद्धा तेजी, जाणून घ्या कसा होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाचा परकीय चलनसाठा 7 मे 2021 ला संपलेल्या आठवड्यात 1.444 अरब डॉलर वाढून 589.465 अरब डॉलर झाला. रिझर्व्ह बँकेद्वारे जारी आकड्यांनुसार, 30 एप्रिल 2021 ला समाप्त झालेल्या आठवड्यात परदेशी चलनसाठा 3.913 अरब डॉलरने वाढून 588.02 अरब होता 29 जानेवारी 2021 ला 590.185 अरब डॉलरवर तो सर्वकालीन उंचीवर होता.

यामुळे आली तेजी

मागील 7 मे 2021 ला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ प्रामुख्याने परदेशी चलन संपत्ती वाढण्याने झाली. परदेशी चलन संपत्ती आठवड्यादरम्यान 43.4 कोटी डॉलरने वाढून 546.493 अरब डॉलरवर पोहचली. परदेशी चलन संपत्ती डॉलरमध्ये मांडली जाते. यामध्ये डॉलरशिवाय युरो, पाऊंड आणि येनमध्ये अंकित संपत्तींचा सुद्धा समावेश आहे. परदेशी चलन संपत्ती सकल परदेशी चलनसाठ्याचा मोठा भाग आहे.

1.016 अरब डॉलरने वाढला सुवर्णसाठा

आठवड्याच्या दरम्यान सुवर्णसाठा 1.016 अरब डॉलर वाढून 36.48 अरब डॉलर झाला. अंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) मध्ये स्पेशल विड्रॉल राईट (एसडीआर) 40 लाख डॉलर कमी होऊन 1.503 अरब डॉलर राहिला. तर, आयएमएफच्या जवळ देशाचा आरक्षित साठा 10 लाख डॉलर कमी होऊन 4.989 अरब डॉलर राहिला.