‘दुबई’मध्ये ‘या’ भारतीय मुलीनं मोडला योगाचा ‘विश्वविक्रम’, 3 मिनिट 18 सेकंदात पूर्ण केलं ‘आव्हान’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दुबई येथे राहणारी एक भारतीय मुलगी समृध्दी कालिया हिने तीन मिनिटांत एका छोट्याशा बॉक्समध्ये 100 योगासन करण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. खलीज टाईम्सच्या अहवालानुसार या मुलीचे हे तिसरे योग पदक आहे. तसेच एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत तिने हा दुसरा विक्रम नोंदविला आहे.

तिने वयाच्या 11 व्या वर्षी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा एका छोट्या स्थानावर सर्वात वेगवान शंभर योगासन करण्याचा विक्रम नोंदवला. तिने बुर्ज खलिफाच्या डेकवर तीन मिनिट 18 सेकंदामध्ये हे आव्हान पूर्ण केले. एका छोट्या बॉक्समध्ये तिने एका मिनिटात सुमारे 40 अ‍ॅडव्हान्स योगासन करण्याची उपाधी मिळवल्यानंतर काही आठवड्यांनंतर हा तिसरा विश्वविक्रम नोंदविला. दुबईच्या अ‍ॅम्बेसेडर स्कूलच्या सातवीच्या विद्यार्थिनीचा असा विश्वास आहे की अशी अविश्वसनीय उपलब्धी केवळ कठोर परिश्रम आणि चिकाटीनेच मिळू शकते.

योगाशिवाय सायकल, टेनिस आणि पोहणे देखील आवडते
खलीज टाईम्सने समृध्दी कालियाच्या हवाल्याने लिहिले की, ‘जर आपण पुढे जाण्याचे धाडस केले तर आपली स्वप्ने साकार होऊ शकतात. मला वाटते की माझी सर्वात मोठी संपत्ती माझी शारीरिक क्षमता नाही तर माझी मानसिक क्षमता आहे.’ कालिया, दररोज तीन तास योगासन करण्याबरोबरच लॉन टेनिस, सायकलिंग, पोहणे, आईस स्केटिंगचा आनंद देखील घेते. ती बॅडमिंटन देखील शिकत आहे. योगामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समृध्दी कालियाला जानेवारी 2020 मध्ये भारतीय वाणिज्य दूतावासानं प्रवासी भारतीय दिवस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

जीवनासाठी योग खूप महत्वाचा आहे
निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी महत्त्वाचा मंत्र म्हणजे योग. यामुळे शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न होते. आयुष्य आनंदी आणि सुखी असावं हीच माणसाची सर्वात मोठी इच्छा आहे. योग शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणारा पॉवर बूस्टर आहे. हा उर्जा वाढवतो. योग बाहेर आणि आत, दोन्ही बाजूंनी विषाणूसोबत लढण्याची क्षमता ठेवतो.