चीनवर लवकरच होणार डिजीटल ‘स्ट्राइक’, अनेक चीनी मोबाईल अ‍ॅपवर येवु शकते ‘बंदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत सरकारने मागच्या महिन्यात राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून टिक-टॉकसह 59 चीनी मोबाइल अ‍ॅपवर प्रतिबंध घातला आहे. आता माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अन्य चीनी मोबाइल अ‍ॅपवर बॅन लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय हेलो लाइट, शेयरइट लाइट, बिगो लाइटसह व्हीएफवाय लाइट अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून सुद्धा हटवले आहे. याबाबतची माहिती सरकारी अधिकार्‍यांच्या संदर्भाने मिळाली आहे. मात्र, अजूनर्यंत सरकारकडून अन्य चीनी मोबाइल अ‍ॅपवर बॅन लावण्याची घोषणा करण्यात आलेली नाही.

हे चीनी अ‍ॅप प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवर होते अ‍ॅक्टिव्ह
हेलो लाइट, शेयरइट लाइट, बिगो लाइट आणि व्हीएफवाय लाइट अ‍ॅप हे प्रतिबंधित मोबाइल अ‍ॅपचे लाइट वर्जन आहे, जे बर्‍याच कालावधीपासून प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवर अ‍ॅक्टिव्ह होते. परंतु, आता ते गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनी अ‍ॅपवर लावला बॅन
माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अंतर्गत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे 59 अ‍ॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता, कारण हे अ‍ॅप भारताचे सावैभौमत्व आणि अखंडता, भारताची सुरक्षा, राज्यांची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी धोकादायक होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयास विविध स्त्रोतांकडून या अ‍ॅप्सबाबत तक्रारी आल्या होत्या, ज्यामध्ये अनेक मोबाइल अ‍ॅपच्या दुरुपयोगाबाबत उल्लेख होता. हे अ‍ॅप आयफोन आणि अंड्रॉईड दोन्ही यूजर्सचा डाटा चोरी करत होते.

या चीन अ‍ॅपवर लावला प्रतिबंध
टिकटॉक- TikTok , शेयरइट- Shareit, कवाई- Kwa , यूसी ब्राऊजर- UC Browser, बायडू मॅप- Baidu map, शेन- Shein, क्लॅश ऑफ किंग्स- Clash of King, डीयू बॅटरी सेवर- DU battery saver, हेलो- Helo, लायकी- Likee, यूकॅम मेकअप- YouCam makeup, एमआय कम्युनिटी- Mi Community, सीएम ब्राऊजर- CM Browers, व्हायरस क्लिनर- Virus Cleaner, आपुस ब्राऊजर- APUS Browser,रोमवी- ROMWE, क्लब फॅक्ट्री- Club Factory, न्यूजडॉग- Newsdog, ब्यूटी प्लस- Beutry Plus, वीचॅट- WeChat, यूसी न्यूज- UC News, क्यूक्यू मेल- QQ Mail, वीबो- Weibo सह59अ‍ॅप्सवर प्रतिबंध लावला आहे.