Coronavirus : सरकारचं ‘कोरोना’ कवच App, तुमच्या जवळ Corona पेशंट आहे का नाही ते सांगणार

पोलिसनामा ऑनलाइन –  भारत सरकार Covid-19 च्या प्रिव्हेंशनसाठी Corona Kavach नावाचा अ‍ॅप आणणार असून हा अ‍ॅप आता बीटा व्हर्जन आहे आणि याची टेस्टिंग चालू आहे. खरंतर हा अ‍ॅप त्या युजर्ससाठी महत्त्वाचा आहे जे संशयित कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांना भेटत आहेत. या
अ‍ॅपला अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर्स गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात.

खरंतर हा अ‍ॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून डेव्हलप केला जात असून लवकरच याचे फायनल व्हर्जनही सादर केले जाणार आहे. सिंगापूरच्या TraceTogether अ‍ॅपमध्ये शॉर्ट डिस्टन्स ब्लूटूथ सिग्नलचा वापरही केला जात आहे.

Corona Kavach अ‍ॅप युजरचे लोकेशन ऍक्सेस करते आणि या आधारे माहिती होऊ शकते कि युजर कुठे-कुठे जात आहे. जर लोकेशन डेटा एखाद्या Covid-19 युजरच्या लोकेशन डेटासह मॅच झाला तर त्या युजरला नोटिफिकेशन द्वारे सूचित केले जाईल. रिपोर्टनुसार, या अ‍ॅपमध्ये त्या युजर्सचा डेटाही असेल ज्यांना सेल्फ क्वारंटाइनसाठी सांगितले गेले आहे. हा अ‍ॅप Covid-19 ने संक्रमित संशयिताची ओळख जारी करणार नाही.

Corona Kavach मध्ये काही खास फीचर्स दिले गेले आहेत. त्याद्वारे युजर्सच्या लोकेशनच्या आधारावर आरोग्य मंत्रालय कोरोना व्हायरसचे प्रसारण ट्रॅक रोखू शकते. याशिवाय तुम्ही जर एखाद्या COVID-19 रुग्णाच्या जवळपास गेला तर हा अ‍ॅप तुम्हाला अलर्ट करून देतो. या अ‍ॅपमध्ये कलर कोडिंगचा आधारही घेतला गेला आहे. हिरवा, पिवळा आणि लाल रंग आहे, ज्याने युजर्सला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळेल.

अ‍ॅपमधील लाल रंग म्हणजे तुम्हाला क्वारंटाइन केले गेले आहे आणि तुमच्या लोकेशनवर लक्ष ठेवले जात आहे. जर युजर आपल्या क्वारंटाइन झोनमधून बाहेर गेला तर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनला माहिती दिली जाते. हिरवा रंग म्हणजे तुम्ही कधीच कोरोना रुग्णाच्या जवळ आलेला नाहीत. या अ‍ॅपला आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. याला लॉग इन केल्यावर तुम्हाला तुमचा नंबर नोंदवायचा आहे. यानंतर तुमच्या फोन नंबरवर आलेला ओटीपी टाकून तुम्ही या अ‍ॅपचे फीचर्स वापरू शकता.