अभिमानास्पद ! ‘या’ भारतीय युवकाने दाखवला व्हॉट्सअ‍ॅपमधील दोष, जिंकले 3.5 लाख

नवी दिल्ली : फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपमधील दोष दाखवणाऱ्या एका भारतीय युवकाला पुरस्कार दिला आहे. हा युवक मणिपूरचा रहिवासी आहे. जॉनेल सॉगैजम असे या युवकाचे नाव असून त्याला या शोधाबद्दल फेसबुकने ५००० डॉलर म्हणजे जवळपास ३.५ लाख रुपयाचे बक्षीस दिले आहे. एवढेच नाही तर फेसबुकने या युवकाला या शोधासाठी ‘Facebook Hall Of Fame 2019’ मध्ये स्थान दिले आहे. ९४ लोकांच्या या यादीत जॉनेलला १६ वे स्थान देण्यात आले आहे. २२ वर्षीय जॉनेल व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहे.

पीटीआयशी बोलताना जॉनेलने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉइस कॉल केल्यानंतर हा बग (दोष) व्हॉइस कॉल व्हिडीओ कॉलमध्ये अपग्रेड करण्याची परवानगी देतो आणि हे सर्व कॉल रिसिव्हरची परवानगी न घेता करता येऊ शकतात. यामुळे कॉल करणाऱ्याला रिसिव्हर काय करतोय याची माहिती मिळणे सहज शक्य होते. यांमुळे रिसीव्हरच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करणे सहज शक्य होते. ही कमतरता जॉनेलने २०१९ मध्ये झालेल्या ‘बग बाउंटी प्रोग्राम’ मध्ये फेसबुकला निदर्शनास आणून दिली.

जॉनेलच्या रिपोर्टनंतर फेसबुकच्या सुरक्षा टीमने ‘ही’ कमतरता १५ ते २० दिवसात दुरुस्त केली

जॉनेलने ही व्हॉट्सअ‍ॅपची कमतरता दाखवल्यानंतर फेसबुकने जॉनेलला इमेल पाठवून ५००० डॉलरचे बक्षीस देतअसल्याची माहिती दिली. दुसरीकडे जॉनेलने म्हंटले की, याच महिन्यात मी माझे नाव ‘Facebook Hall Of Fame 2019’ मध्ये पाहिले. फेसबुकने २०१४ मध्ये व्हॉट्सअ‍ॅप १९ बिलियन डॉलरला खरेदी केले होते.