मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बेस्ट डान्सर, अ‍ॅक्टर, डिरेक्टर अशी ओळख असणाऱ्या प्रभु देवा यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताचा मायकल जॅक्सन अशी प्रभु देवा यांची ओळख आहे. त्यांच्या कला क्षेत्रातील नृत्याबद्दलच्या कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपल्या डान्स आणि कोरिओग्राफीने ते कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत. मुख्य म्हणजे मॉडर्न डान्सला भारतीय चित्रपटसृष्टीत आणण्याचं श्रेय प्रभु देवा यांनाच जातं. अनेकांना माहित नसेल परंतु प्रभु देवा यांचे पूर्ण नाव प्रभु देवा सुंदरम असे आहे. प्रभु देवा हे दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिध्‍द कोरिओग्राफर मुगुर सुंदर यांचे सुपुत्र आहेत. प्रभु देवाने धर्मराज आणि उदुपी लक्ष्मीनारायण यांच्‍याकडून भरतनाट्यमचे धडे घेतले.

आज राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्विकारताना प्रभु देवा यांनी पारंपरिक वेष धारण केला होता. पांढरी शुभ्र लुंगी त्यांनी परिधान केली होती. प्रभु देवाला राजू सुंदरम आणि नागेंद्र प्रसाद हे दोन भाऊ आहेत. प्रभु देवा यांचे हे दोन्ही भाऊ डान्‍स मास्तर आहेत. मुख्य म्हणजे प्रभु देवाला चित्रपट ‘मिन्‍सारा कनावु’ (१९९७) आणि ‘लक्ष्‍य’ (२००४) साठी दोन वेळा राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले होते.

चित्रपटात एन्‍ट्री
प्रभु देवा यांनी आपल्या आयुष्यातील पहिली भूमिका तमिळ चित्रपटात साकारली. त्यांनी तमिळ चित्रपट ‘मोउना रागम’मध्‍ये पहिल्‍यांदा स्क्रीनवर बासुरी वाजवताना एका तरुणाची भूमिका केली होती. यानंतर त्यांनी अनेक तमिळ चित्रपटांत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले. प्रभु देवा यांनी पहिल्यांदा कोरिओग्राफ केलेला चित्रपट म्हणजे ‘वेत्री विजा’. या चित्रपटात त्यांनी कमल हसन यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी खूपच कमी कालावधीत दाक्षिणात्य चित्रपटात नाव कमावले. यानंतर प्रभु देवा हे बाॅलीवूडकडे वळाले.

प्रभु देवा यांनी करिअरची सुरुवात डान्सिंगने केली होती. यानंतर ते अभिनय क्षेत्रातही वळले. आणि त्यांनी अभिनयातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर प्रभु देवा दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मातेही बनले. प्रभु देवा यांनी तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट दिग्‍दर्शित केले आहे. ‘वॉन्टेड’, ‘राउडी राठौड’, ‘रमैया वस्तावैय्या’ आणि ‘ॲक्शन जॅक्सन’ यासारखे हिंदी चित्रपट हिट ठरले आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विखेंना कडाडून विरोध !

सवर्ण आरक्षण रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुस्लिमांनी मतदान करु नये अशी भाजपची इच

‘देशाचं माहीत नाही, साताऱ्यात मीच जिंकणार’

मी ‘करिअर’ म्हणून राजकारणाला कधी निवडले नाही