अखेर ‘त्या’ जादूगाराचा मृतदेह सापडला ; हातपाय ‘कुलूपांनी’ बांधून नदीत घेतली होती उडी

कोलकाता : वृत्तसंस्था – जादु दाखवण्याच्या नादात स्वतःचे हातपाय कुलूपांनी बांधून हुगळी नदीत झोकून देणारे जादूगार चंचल लाहिरी यांचा मृत्यू झाला आहे. जादूचा प्रयोग करत असताना हात पाय बांधुन घेत एका काचेच्या पेटीत नदीत उतरलेल्या चंचल लाहिरी यांचा मृतदेह अखेर सापडला. जादूचा प्रयोग करताना ते रविवारी बेपत्ता झाले होते. मात्र दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह हाती लागला.

कोलकात्याचे जादूगार चंचल लाहिरी हे मॅंड्रेक म्हणूनही ओळखले जायचे. ते जादूचा प्रयोग करत असताना अचानक बेपत्ता झाले होते. त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा निष्प्राण देह सापडला. स्टीलच्या पिंजऱ्यात ३० फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी हा स्टंट केला, त्यावेळी त्यांचे हात-पाय साखळ्या आणि दोरखंडाने बांधलेले होते. पाण्याखाली स्वतःला सोडवून त्यांनी किनाऱ्यावर सुरक्षित परतणे अपेक्षित होते. मात्र, बराच काळ वाट पाहूनही ते बाहेर न आल्याने उपस्थित लोकांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. यानंतर कोलकाता पोलिसांनी आणि स्कूबा डायव्हर्सच्या पथकांनी हा भाग पिंजून काढत त्यांचा शोध घेतला.

याआधी एकवीस वर्षांपूर्वी याच ठिकाणी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी अशाच प्रकारचा स्टंट केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर 

 ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू 

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका 

You might also like