2000 की 100 ची नोट, ‘सिंगर’ नेहा कक्करनं गरीब मुलींना नेमके किती रुपये दिले ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल 11 ची जज नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येताना दिसत आहे. आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहा अनेकदा चर्चेचा हिस्सा बनत असते. नेहा किती दिलदार आहे हेही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पुन्हा एकदा तिचा दिलदारपणा दिसला आहे. नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हाययल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

#nehakishaadi ???

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काही दिवसांपूर्वीच नेहानं इंडियन आयडल 11 चा स्पर्धक सनी याला 2 लाख रुपये देऊन त्याची मदत केली होती. नेहाचा आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे ज्यात नेहा दोन गरीब मुलींना पैसे देताना दिसत आहे.

आउिटंगला गेलेल्या नेहाला पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी करत तिला घेरलं. यावेळी तिच्यापुढे दोन मुली आल्या आणि त्यांनी नेहाला पैसे मागितले. अशात नेहानं त्या मुलीला 2000 ची नोट दिली आणि म्हणाली की, दोघींमध्ये वाटून घ्या. परंतु ती मुलगी ते पैसे घेऊन निघून गेली. हे पाहून नेहानं त्या दुसऱ्या मुलीलाही सेपरेट एक नोट दिली.

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना नेहाचं हे वागणं खूप आवडलं आहे. अनेकांनी नेहाच्या या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. अनेकांनी म्हटलं आहे की, नेहाच काळीज खूप मोठं आहे. कोणी असंही म्हटलं की, एवढे पैसे देणं म्हणजे साधी गोष्ट नाही.

व्हिडीओत दिसत आहे की, मुलींना पैसे दिल्यानंतर जेव्हा नेहा जायला निघते तेव्हा तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ती हसायला लागते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि इंडियन आयडल 11 चा अँकर आदित्य नारायणच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. 14 फेब्रुवारी रोजी दोघांचं लग्न होणार होतं परंतु नंतर समजलं की, हे सगळं टीआरपीसाठी करण्यात आलं होतं.

 

 

You might also like