Indian Idol 11 : ‘हे’ आहेत ग्रँड फिनालेचे TOP चे 5 स्पर्धक, मोबाईलवर ‘अशी’ पहा LIVE स्ट्रीमिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेमस टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 13 नंतर आता इंडियन आयडल 11 लवकरच संपणार आहे. रविवारी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी इंडियन आयडल 11 चा ग्रँड फिनाले होणार आहे. सर्व टॉप 5 स्पर्धक यासाठी तयार आहेत. हे स्पर्धक कोण आहेत तसेच कुठे आणि किती वाजता लाईव स्ट्रीमिंग ऑन एअर होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

हे आहेत इंडियन आयडलचे टॉप 5 स्पर्धक
1) सनी हिंदुस्तानी- भटिंडा
2) रोहित राऊत- लातूर
3) अद्रिज घोष- कोलकाता
4) अनकोना मुखर्जी
5) रिधन कल्याण- अमृतसर

यापैकी अनकोना एकमेव फीमेल कंटेस्टेंट आहे. यापैकी सनीला तर आधीच म्युझिक कंपोजर हिमेश रेशमिया, अमित कुमार आणि शमीर टंडन यांनी आपली गाणी गाण्यासाठी बुक केलं आहे.

लाईव वोटींग
तुम्ही SonyLiv ॲप डाऊनलोड करून sonliv.com वर जाऊन आवडत्या स्पर्धकाला वोट करू शकता. नॉर्मल वोटींगसाठई युजर Sonyliv ॲप किंवा firstcry.com वर लॉगईन करून नॉर्मल वोट करू शकतात. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत वोटींग लाईन्स सुरू असणार आहे.

ग्रँड फिनालेमध्ये आयुष्मान खुराना सोडणार आपले सूर
आयुष्मा खुराना शुभमंगल ज्यादा सावधानच्या टीमसोबत फिनालेत येणार आहे. कॉमेडियन कृष्णाही हजर असणार आहे. शोचा अँकर आदित्य नारायण आणि जज नेहा कक्कर आपलं सादरीकरण करणार आहेत.

इथं पहा शोचा ग्रँड फिनाले
रात्री 8 वाजता सोनी टीव्हीवर तुम्ही ग्रँड फिनाले पाहू शकता. याशिवाय SonyLiv ॲपचे प्रीमियम अकाऊंट होल्डर मोबाईलवर फिनाले पाहू शकतात. जिओ सब्सक्रायबर्स जिओ टीव्ही आणि एअरटेल सब्सक्रायबर्स Airtel XStream वर लाईव पाहू शकतात. वोडाफोन युजर्स वोडापोन प्ले वर आणि बीएसएनएल वाले मोबाईल टीव्ही ॲपवर फिनालेचा आनंद घेऊ शकतात.

You might also like