आईनं विकले फुगे, त्यानं केलं बुट पॉलिश, संगीताचं शिक्षण न घेतादेखील सनी हिंदुस्तानी बनला Indian Idol

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सनी हिंदुस्तानी यानं इंडियन आयडल 11 चा किताब आपल्या नावावर केला आहे. विजेता झालेल्या सनीला इंडियन आयडलची चमचम करणारी ट्रॉफी आणि 25 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय त्याला टाटा अल्ट्रोज कारही देण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे सिंगर हिमेश रेशमियाच्या आगामी सिनेमात त्याला गाण्याची संधी मिळणार आहे. सनी आज विनर झाला असला तरी तो आपले जुने आणि गरिबीतील दिवस अजिबात विसरलेला नाही.

https://www.instagram.com/tv/B858BGJHYzb/?utm_source=ig_embed

सनी पंजाबच्या भटींडामधील अमरपुरा वस्तीतील रहिवासी आहे. शोमध्ये येण्याआधी सनी रस्त्याच्या कडेला बुट पॉलिश करण्याचं काम करत असे. त्याची आई फुगे विकण्याचं काम करत होती. कधी कधी परिस्थिती अशी व्हायची की, त्याच्या आईला दुसऱ्यांच्या घरी तांदूळ मागावे लागत असे. हे पाहून सनीला खूप वाईट वाटायचं. लहान वयातच त्यानं अनेक चढ उतार पाहिले आहेत. कधी कधी तर दोन वेळचं जेवणही मुश्किलीनं मिळत असे.

https://www.instagram.com/tv/B81KXl2lADk/?utm_source=ig_embed

सनीच्या आवाजाचे सारेच चाहते आहेत. प्रेक्षकांपासून तर जजपर्यंत त्यानं साऱ्यांनाच आपल्या सुरांनी हैराण केलं आहे. जजनंही अनेकदा सांगितलं आहे की, त्याचं गाणं ऐकून नुसरत फतेह अली खानची आठवण येते. सनीला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. सनीनं कधीच संगीताचं शिक्षण घेतलं नाही. सनी ऐकून ऐकूनच गाणं शिकला आहे.

सनीनं एका दर्ग्यावर नुसरत फतेह अली खान यांचं वो हटा रहे है परदा हे गाणं ऐकलं आणि त्याला रडूच कोसळलं. इथूनच त्याला गाण्याचा छंद जडला. यानंतर त्यानं नुसरत फतेह अली खानसह इतर गायकांची गाणी गायला सुरुवात केली.

शो दरम्यानच कंगना रणौतच्या पंगा सिनेमासाठी गाणं गाण्यासाठी गायक शंकर महादेवन यांनी आपल्यासोबत सनीला गाण्याची संधी दिली होती. जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिलं होतं.