Indian Idol 12 : सुनिधी चौहाननं सांगितली ‘इंडियन आयडल’ची ‘रिॲलिटी’; म्हणाली – ‘मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडवरून ‘इंडियन आयडल’ (Indian Idol 12) या रिअ‍ॅलिटी शोचा १२ सीझन चर्चेत आहे तो वादांमुळे. आता सुरू झालेला हा वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी या एपिसोडवर नाराजी व्यक्त केली. ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंत याने या शोवर राग व्यक्त केला आहे. या पाठोपाठ आता बॉलिवूड गायिका सुनिधी चौहान हिनेही शोबद्दल धक्कादायक बाब समोर आणली आहे.

“मला शोच्या कंटेस्टंटचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते, सरसकट सगळ्यांचे नाही. पण हो, कौतुक करायचे असे मला सांगण्यात आले होते. मेकर्सला अपेक्षित असणा-या सगळ्या गोष्टी मी करू शकले नाही आणि त्यामुळे मला शोपासून दूर जावे लागले. ‘इंडियन आयडल १२’ जज करत असलेले नेहा कक्कर, हिमेश रेशमिया व विशाल ददलानी यांच्याबद्दल सुनिधी बोलली. हे तिन्ही जज कधीच स्पर्धकांच्या चुका सुधारताना दिसत नाहीत. मग सकारात्मक टीकेसह शो जज करणे सोडाच. असे रिअ‍ॅलिटी शो संगीत शौकीनांसाठी मोठे तिकिट ठरत आहेत, हे खरे. पण यात स्पर्धकांचेच नुकसान होते. स्पर्धकांना त्यांच्या भावुक कथामुळे रातोरात प्रसिद्धी व ओळख मिळते. काही स्पर्धक खरोखर मेहनत घेतात. पण लवकरात लवकर यशस्वी होण्याच्या हव्यास स्पर्धकांना मानसिकदृष्ट्या निश्चितपणे प्रभावित करतो. यात स्पर्धकांची चूक नाहीच. हा फक्त टीआरपीचा खेळ आहे” असे सुनिधी म्हणाली. सुनिधी ‘इंडियन आयडल’च्या पाचव्या आणि सहाव्या सिझनमध्ये जज होती. त्याचदरम्यानचे अनुभव तिने शेअर केलेत.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये सर्व स्पर्धक एका टेकमध्ये गातात का? असा सवाल केला असता सुनिधी म्हणाली, “ते गातात. पण कधी कधी काही सिंगरच्या गाण्यात वा रेकॉर्डिंगमध्ये काही त्रुटी दिसल्यास शो टेलिकास्ट करण्यापूर्वी त्या त्रुटी दूर केल्या जातात. मला कॅमे-यासमोर जाण्याआधी सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते, असा खुलासा अलीकडे अमित कुमार यांनी केला होता. यावरही सुनिधी चौहान बोलली. ती म्हणाली, ‘आपल्याला अमित कुमार यांच्या त्या मुलाखतीला विसरुन चालणार नाही. मेकर्सचा हेतू काय आहे? इंडियन आयडलचे मेकर्स हा शो फक्त पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत का? स्पर्धा खूप आहे. माझ्या मते, हे केवळ शोकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी केले जाते आणि त्यांचे मनसूबे यशस्वी होतातही. यात रिअल टॅलेंटचे नुकसान होते.”

Health Tips : ब्रेन पावर वाढवते ‘ही’ एरोबिक एक्सरसाईज, जाणून घ्या इतर फायदे

Pune : दुचाकी दुरुस्त करुन देण्यास दिला नकार, तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खून

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

 

दुर्दैवी ! मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 8 गाभण मेंढ्या ठार तर 16 जखमी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’