इंडियन आयडल : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी केले ‘भरतनाट्यम’, व्हायरल झाला Video

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर आपल्या शैलीने जादू करत आहे. त्यांच्या अभिनयापासून नृत्यापर्यंत अनेक रूपाने प्रेक्षकांचे मन जिकंले आहे. आता राजकारणात सक्रिय झालेलया हेमा मालिनीने खूप वर्षानंतर पुन्हा एकदा जुना अंदाज दाखवला आहे. रियॅलिटी शो इंडियन आयडलच्या सेटवरील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेमा मालिनी यांचे सुंदर नृत्य
व्हायरल व्हिडिओमध्ये हेमा मालिनी या भरतनाट्यम नृत्य करत आहेत. त्यांचा अंदाज पाहून सर्व स्तब्ध झाले आहेत आणि फक्त त्यांचीच तारीफ करत आहेत. हेमा मालिनी चांगल्या भरतनाट्यम नृत्यांगना आहे, हे सर्वांना माहित आहे. इंडियन आयडल या सेटशी इतके बांधले गेलेले आहेत की, ड्रीम गर्ल स्वतःला रोखु शकली नाही. त्यांच्या आदाकारी नृत्यातून त्यांनी हे दाखवून दिले की, त्यांच्या इतके सुंदर नृत्य कोणी करू शकत नाही. सेटवर असलेले लोक हेमा मालिनींचे नृत्य पाहतच राहिले.

 

 

 

हेमा मालिनी यांना ट्रिब्यूट
यावेळेस जेव्हा हेमा मालिनी इंडियन आयडलच्या सेटवर येतील तेव्हा त्या आपल्या आयुष्यातील काही रहस्यमय गोष्टी सांगणार आहेत. चित्रपटातील इनसाईड गोष्टींपासून धर्मेद्रसोबत प्रेम कहाणीपर्यंत अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत उघड करणार आहेत. एपिसोडमध्ये त्यांच्या चित्रपटातील गाण्याच्या आधारावर नृत्य सादर करून त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न करणार आहेत. काही एपिसोडमध्ये धर्मेंद्र यांनी एन्ट्री घेतली होती. त्यांनीही अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या होत्या आणि हेमा मालिनी यांच्याशी मनोरंजक गोष्टी केल्या. त्यातच हेमाजीं काय नवीन गोष्टी सांगणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंडियन आयडल बंद होणार?
इंडियन आयडल १२ बद्धल बोलायचे झाले तर शो कमी टीआरपीमुळे वेळे आधीच संपवला जाऊ शकतो. असे म्हंटले जात आहे की, २७ मार्चला इंडियन आयडलचा शेवटचा एपिसोड दाखवला जाईल. त्यानंतर सुपर डान्सर ४ ऑनएअर घेण्याची तयारी चालू आहे. निर्मात्यांना ही अपेक्षा आहे की, इंडियन आयडलला मिळालेली कमी टीआरपी ची भरपाई त्यांचा डान्स शो करू शकेल.