मुलाच्या उपचारासाठी सोडला इंडियन आयडॉलचा मंच, वेदनादायक फरमानीची कहाणी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सोशल मीडियावर आपल्या आवाजाची जादू चालवून इंडियन आयडॉलच्या मंचावर पोहोचलेल्या  मुजफ्फरनगरच्या फरमानीने मातृत्वासमोर आपल्या स्वप्नांना प्राधान्य दिले नाही.  फरमानीने सांगितले कि,  मुलाचे ऑपरेशन करण्यासाठी तिने इंडियन आयडॉलच्या मंचाकडे पाठ फिरविली.  शो मधून  सोडून गेलेली फरमानी आता मेरठच्या खासगी रुग्णालयात मुलाच्या ऑपरेशननंतर खूप खुश आहे. देशातील जनतेच्या अफाट मतांनी प्रोत्साहित झालेली फरमानी आता गायन क्षेत्रात आणखी पुढे जाण्याची इच्छा बाळगते. मुझफ्फरनगरमधील मोहम्मदपूर लोहड्डा येथे राहणारा मोहम्मद आरिफ यांना पाच मुले आहेत, त्यातील एक फरमानी आहे. फरमानीचे लग्न वडील आरिफने तीन वर्षांपूर्वी मेरठ जिल्ह्यातील छोटा हसनपूर गावात एका तरूणाशी लग्न लावून दिले.

मुलामुळे सोडावं लागलं होत सासर 
दोन वर्षांपूर्वी फरमानीने एका मुलाला जन्म दिला. परंतु जन्मापासूनच मुलाच्या घश्यात छिद्र असल्या कारणाने फरमानीच्या सासरच्यांनी मुलाला स्वीकारण्यास  नकार दिला, त्यानंतर फरमानी आपल्या मुलासह माहेरी परतली. येथूनच  फरमानीने गायनाला सुरुवात केली. गावात व्हिडिओ बनविता येणारा आशु बच्चन आणि राहुल यांनी फरमानीच्या गाण्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले, त्यानंतर हा व्हिडिओ आल्यानंतर फरमानी सोशल मीडियाचा एक प्रसिद्ध चेहरा बनली. सोशल मीडियावर फरमानीचा आवाज ऐकून देशाच्या प्रसिद्ध गायन कार्यक्रम इंडियन आयडॉलच्या आयोजकांनीही  फरमानी  आणि तिचा भाऊ फरमानला इंडियन आयडॉलच्या मंचावर गाण्यासाठी आमंत्रित केले.

ऑडिशनसाठी निवड झाल्यानंतर फरमानी मुंबईतच होती. परंतु फरमानीचे म्हणणे आहे की,  त्याच वेळी मेरठमध्ये आपल्या मुलाच्या ऑपरेशनची तारीख जवळ आली होती, त्यानंतर फरमानीने  इंडियन आयडॉल शो मधीच सोडला आणि घरी परतली. सध्या फरमानीच्या मुलाची  मेरठमधील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आपल्या लाखो चाहत्यांचे आभार मानताना फरमानीने गायकी पुढेही सुरु ठेवणार असल्याचे म्हंटले.