Indian Independence Movement | दिवाळीनिमित्त ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले सोने-चांदीचे नाणे

लंडन : वृत्त संस्था – Indian Independence Movement | भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून (Indian Independence Movement) जगाला अहिंसेची (Ahimsa) शिकवण देणारे महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) जीवन आणि वारसा यांचे पहिल्यांदा ब्रिटन (Britain) मध्ये विशेष संग्रही नाण्याच्या (Collector’s Coin) माध्यमातून स्मरण करण्यात येत आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

हे नाणे हिंदू सण दिवाळीच्या (Hindu Festival Diwali) निमित्ताने रॉयल मिंट संग्रहाचा भाग असेल, ज्यावर भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आणि गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य ‘मेरा जीवन ही मेरा संदेश है’ लिहिलेले (Indian Independence Movement) आहे. असे पहिल्यांदा होत आहे जेव्हा एखाद्या अधिकृत ब्रिटिश नाण्याच्या माध्यमातून गांधीजींचे स्मरण केले जाईल.

सुनक यांनी म्हटले, एक हिंदू म्हणून दिवाळीला हे नाणे जारी करताना मला अभिमान वाटत आहे.
महात्मा गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाची भूमिका निभावली होती आणि पहिल्यांदा एखाद्या ब्रिटिश नाण्याच्या माध्यमातून त्यांच्या उल्लेखनीय जीवनाचे स्मरण करणे शानदार आहे.

पाच पाऊंडचे हे नाणे सोने आणि चांदीपासून बनवले आहे आणि हे वैध चलन आहे.
मात्र, ते सामन्य चलनासाठी बनवलेले नाही. दिवाळीच्या निमित्ताने गुरुवारपासून हे विक्रीसाठी उपलब्ध होईल.
यासोबतच एक ग्रॅम आणि पाच ग्रॅम सोन्याचे बार आणि धन-धान्याच्या देवी लक्ष्मीचे चित्र असलेला पहिला ब्रिटिश सोन्याचा बार सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असेल.

सुनक यांनी जीवनातील सर्व क्षेत्रात अल्पसंख्याक समाजाच्या योगदानाचे योग्य प्रतिनिधीत्व करण्याच्या अभियानाच्या सहभागांतर्गत मागील वर्षी एक नवीन ‘डायव्हर्सिटी बिल्ट ब्रिटन’ नाणे जारी केले होते.
ब्रिटनच्या विविध इतिहासाचा जल्लोष साजरा करणारी जवळपास 1 कोटी नाणी ऑक्टोबर 2020 मध्ये चलनात आली. (Indian Independence Movement)

Web Title :-  Indian Independence Movement | mahatma gandhis legacy to be commemorated on special uk collectors coin

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात ‘कपात’; जाणून घ्या पुण्यातील दर

Pune Crime | 200 वाहन चोरी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 36 लाखांच्या 51 दुचाकी जप्त

Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’

Tax Refund | करदात्यांची दिवाळी ! CBDT ने 91.30 लाख करदात्यांना केला 1.12 लाख कोटी रुपयांचा कर परतावा