आश्चर्यकारक ! ११ साथीदार बुडाले, मात्र ‘हा’ ५ दिवस कोणत्याही मदतीविना ५ दिवसानंतर जिवंत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगण्याची इच्छा असेल तर मृत्यूदेखील आपल्यासमोर हार पत्करतो अशी एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय पश्चिम बंगालमधील एका मच्छीमाराच्या बाबतीत आला आहे. जगण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या या मासेमाराचे समुद्र देखील काही बिघडवू शकला नाही. पश्चिम बंगाल मधील रवींद्रनाथ दास हा मच्छीमार ५ दिवस समुद्रात आपल्या आयुष्याची लढाई लढत होता. शेवटी पाच दिवसानंतर त्याला बचाव पथकाने बाहेर काढत त्याचा जीव वाचवला।

https://twitter.com/sdeepayan/status/1149257257965645824

लाइफ जॅकेट आणि कोणत्याही प्रकारच्या अन्नाशिवाय त्याने ५ दिवस समुद्रात काढले. तेलाचे रिकामे ड्रम आणि बांबूच्या साहाय्याने त्याने स्वतःला ५ दिवस जिवंत ठेवले. मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर मच्छिमारांची नाव वाहून गेल्यानंतर तो बंगालच्या खाडीत फसला. त्यानंतर अखेर ५ दिवसांनी बांग्लादेशच्या चितगावच्या समुद्री तटावर त्याला बचाव पथकाने बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी कोलकात्याला आणण्यात आले असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

हवामान खराब असल्याने त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या ५ दिवसात त्याने फक्त पावसाच्या पाण्यावर आपली तहान भागवली. त्याने दिलेल्या माहितीनुसार ६ जुलै रोजी त्याची बोट वाहून गेली. पश्चिम बंगालमधील नारायणपुरचे रहिवासी असलेले दास ४ जुलै आपल्या ११ साथीदारांसह मासेमारीसाठी निघाले होते. मात्र त्यांची बोट पलटी झाल्याने त्यांच्या ११ साथीदारांसह त्यांनी समुद्रात उडी मारली.

दरम्यान, अन्य ११ मच्छीमार हळूहळू समुद्रात वाहून गेले मात्र दास यांनी साहस दाखवत स्वतःला जिवंत ठेवले. त्यांनी तेलाच्या ड्रम आणि बांबूच्या साहाय्याने स्वतःला वाचवत समुद्रकिनारी आणले त्यानंतर त्यांना बचाव पथकाने बाहेर काढले.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा