विजयाची हॅट्रिक

जकार्ता : वृत्तसंस्था 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा ८-० असा पराभव केला . भारताने इंडोनेशिया , जपान आणि हाँगकाँग यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली . या विजयासह भारताने ‘ अ ‘गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2222dbb-a832-11e8-a3b3-a5a8016b4337′]

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने जपानवर दबाव निर्माण करत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. एस.व्ही. सुनीलने ७ व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दिलप्रीतने १० व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी केली. जपानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. त्याचबरोबर दिलप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, अक्षदीप सिंग आणि सुनील एस. यांनी प्रत्येकी एक गोल केला.

याआधी पहिल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा १७-०आणि दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा २६-० असा धुव्वा उडवला होता. भारताने सलग तीन सामने जिंकत आणि ५१ गोल नोंदवले .

भारताचा पुढील सामना कोरियासोबत होणार असून त्यानंतर श्रीलंकेसोबत मुकाबला लागणार आहे.