नौदलात 1200 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी, 57000 रूपये पगार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आयटीआय करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. नौसेनेने एन्ट्रन्स परीक्षेद्वारे ट्रेड्समन मेटसाठी 1200 पदांवर भरती काढली आहे. याकरीता 22 फेब्रुवारी म्हणजे आजपासूनच अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 7 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारास इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी पास हवा. याशिवाय मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय झालेला असावा. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असायला हवे. ईस्टर्न नेव्हल- 710, वेस्टर्न नेव्हल – 324 पदे, साउदर्न नेव्हल – 125 पदे अशा एकूण 1159 पदावर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 18 हजार रुपयांपासून 56,900 रुपये प्रति महिना पगार आणि याशिवाय केंद्र सरकारचे भत्ते असा पगार दिला दिला जाणार आहे. आरक्षणातून अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल केली आहे. खुला प्रवर्ग, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क 205 रुपये आहे. तर इतरांसाठी कोणतेही शुल्क नाही.