Indian Navy Recruitment 2021 | 12 वी पास तरूणांसाठी इंडियन नेव्हीत 2500 पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Navy Recruitment 2021 | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन नेव्हीकडून (Indian Navy) चांगली बातमी आहे. नेव्हीने सीनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR) आणि आर्टिफिशियल अप्रेंटिस (AA) च्या 2500 पदांवर भरती काढली असून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. (Indian Navy Recruitment 2021)

 

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल परीक्षा आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर होईल.

 

Indian Navy Recruitment 2021 : महत्वाच्या तारखा

अर्जाची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021

अ‍ॅप्लीकेशन फॉर्म कम्पलीट करण्याची अंतिम तारीख – 25 ऑक्टोबर 2021

मेरिट लिस्ट जारी करण्याची तारीख – जानेवारी / फेब्रुवारी 2022

भरती परीक्षेची तारीख – सध्या ठरलेली नाही

 

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
नोटिफिकेशननुसार या पदांवर अर्ज करणारे उमेदवार 60% गुणांसह 12वी पास असावेत.

इंटरमिजिएटमध्ये त्याच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, गणित किंवा कम्प्युटर सायन्स विषय असावेत.

अर्ज केवळ तेच लोक करू शकतात ज्यांची जन्म तारीख 1 फेब्रुवारी 2002 ते 31 मार्च 2005 च्या दरम्यान असेल.

याबाबत अधिक माहिती भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये मिळेल.

शारीरीक पात्रता
किमान उंची 157 सेंटीमीटर

1600 मीटर धावणे 7 मिमिटात पूर्ण करावे लागेल.

20 स्क्वेट अप आणि 10 पुश अप मारावे लागतील.

 

अर्ज शुल्क
इंडियन नेव्हीच्या (indian navy) या पदांवर अर्ज करणार्‍या कोणत्याही कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

 

ही आहे निवड प्रक्रिया
सर्वप्रथम अर्जदारांना मेरिटच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जाईल.

जे लोक मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवतील ज्यांनाच परीक्षेत सहभागी होण्याची परवानगी असेल.

यानंतर जे परीक्ष पास करतील त्यांना फिजिकल आणि ते पस केल्यानंतर मेडिकलसाठी बोलावले जाईल.

जे परीक्षेचे तीनही टप्पे पास करतील, त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर नोकरी मिळेल.

असा करा अर्ज
या पदांवर अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी नेव्ही रिक्रुटमेंट वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जावे लागेल. येथे त्यांना भरतीचे नोटिफिकेशन आणि अर्ज भरण्याची लिंक मिळेल.

 

Web Title :- Indian Navy Recruitment 2021 | indian navy recruitment 2021 indian navy recruitment 10 2 sailor entry aa and ssr vacancy for 2500 posts check details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात ऑर्केस्ट्रामधील गायिकेवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; शारिरीक संबंधाचे फोटो-व्हिडिओ काढून धमकावत केला बलात्कार

Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘काम’ देण्याच्या आमिषाने पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी ‘लैंगिक’ अत्याचार, महिलेसह पतीला जीवे मारण्याची धमकी

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघात 3 ठार तर 6 जण जखमी; सहा वाहने एकमेकांवर आदळली