Indian Navy Recruitment | भारतीय नौदलात 350 हून अधिक नाविक पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन नेव्हीने नाविक पदांसाठीची (Indian Navy Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत इंडियन नेव्हीमध्ये 350 जागांची भरती (Indian Navy Recruitment) करण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी इंडियन नेव्हीच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत साइटवर अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज (Apply online) करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 पर्यंत आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 350 जागांवर भरती करण्यात येणार आहे. 1750 उमेदवारांमधून 350 जागांसाठी लेखी चाचणी व शारीरिक तंदुरुस्तीसाठी (PFT) (Physical Fitness) बोलावले जाणार आहे. लेखी परीक्षेला हजेरी लावण्यासाठी कट ऑफ गुण हे राज्यांनुसार वेगवेगळे असू शकतात.

महत्त्वाच्या तारखा

– अर्ज करण्यास प्रारंभ तारीख – 19 जुलै 2021
– अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021

शैक्षणिक पात्रता

सेलर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शालेश शिक्षण मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान असावा.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा आणि पीएफटीद्वारे (PFT) उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षा आणि
पीएफटीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग पात्रता परीक्षेच्या टक्केवारीच्या आधारे (10 वी परीक्षा)
केली जाईल. कट ऑफ गुण राज्यांनुसार वेगवेगळे असू शकतात. कारण रिक्त जागा राज्यनिहाय भरण्यात येणार आहे.

वेतन

नाविक (sailor) पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षण (Training) कालावधीत 14 हजार 600 रुपये वेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिफेन्स पे मॅट्रिक्स (21,700 रुपये – 69,100 रुपये) वेतन पातळी तीनमध्ये ठेवले जाईल. तसेच त्यांना दरमहा 5200 रुपयांचा डीए दिला जाणार आहे.

हे देखील वाचा

Maharashtra cabinet reshuffle | राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?

Pune Fire | पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील वंडरलँड बिल्डिंगच्या समोरील इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Indian Navy Recruitment | recruitment of more than 350 sailors in the indian navy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update