भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ; २७०० पदांची होणार भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय नौदलात एकूण २७०० जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसहित १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून २८ जूनपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०१९ हि असणार आहे. वेतनही ₹ २१,७०० ते ₹ ६९,१०० इतके भरघोस असणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने कंप्युटर बेस्ड परीक्षा होणार असून त्यांनतर शारिरीक चाचणी होईल.

एकूण जागा : २७००

पदाचे नाव & तपशील:

१. पदाचे नाव : सेलर (AA)

पद संख्या : ५००

शैक्षणिक पात्रता: गणित व भौतिकशास्त्र विषयात ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण.

२. पदाचे नाव : सेलर (SSR)

पद संख्या : २२००

शैक्षणिक पात्रता: १२ वी (गणित व भौतिकशास्त्र)उत्तीर्ण.

उंची : १५७ से.मी.

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००३ दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

परिक्षा शुल्क : General/OBC: ₹२०५/- [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : २८ जून २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जुलै २०१९

अर्ज करण्यासाठी लिंक : https://www.joinindiannavy.gov.in/en/account/login

अधिक सविस्तर माहिती www.joinindiannavy.gov.in या नौदलाच्याच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.

You might also like