भारतीय नौदलात ४०० पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाने ४०० नाविक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज मॅट्रिक रिक्रुट एप्रिल २०२० च्या बॅचसाठी आहे. Indian Navy Salior Recruitment बाबतची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :-

नाविक पदांसाठी अर्जाची प्रक्रिया २६ जुलै २०१९ पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१९ आहे. Sailor – Matric या पदांसाठी ४०० पदे रिक्त आहेत. यासाठी पे स्केल १४,६०० रुपये दरमहा असणार आहे. पे मेट्रिक्स २१,७०० – ६९,१०० असणार आहे.

मॅट्रिक्युलेशन परिक्षा देण्यासाठी उमेदवाराने MHRD द्वारे मान्यता प्राप्त बोर्ड ऑफ स्कूल मधून शिक्षण घेतलेले असावे. Sailor post या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार भारतील नौसेनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर (www.joinindianavy.gov.in) जाऊ शकतात. हा अर्ज २६ जुलै ते १ ऑगस्ट मध्ये करता येईल.

नाविक पदांसाठी निवड राज्यांआधारे मेरिटच्या आधारे होईल. ही मेरिट कंप्युटर बेस्ट परिक्षेच्या आधारे तयार करण्यात येईल. याशिवाय उमेदवाराला फिजिकल फिटनेस टेस्ट आणि फिटनेस मेडिकल परिक्षा क्वालिफाय करावी लागेल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like