खुशखबर ! १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी नौदलात २७०० जागांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाकडून सेलर पदांसाठी (AA,SSR) अर्ज मागविण्यात आले आहेत. AA पदासाठी ५०० आणि SSR च्या २२०० पदांसाठी ही भरती होणार आहे. भरती एकूण २७०० पदांसाठी होणार आहे. यासंबंधी नौदलाकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. या पदांसाठी तुम्ही पात्र असाल तर जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया.

पात्रता
विज्ञान शाखेतून १२ वी पास असणे आवश्यक.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००३ पर्यंत झाला असला पाहिजे.

अर्ज फी
खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क २०५ रुपये तर SC आणि ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरू २८ जून २०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०१९

येथे करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावेत.
वेबसाईट – joinindiannavy.gov.in
निवड झालेल्या उमेदवारांना २१,७०० ते ६९, १०० रुपयांपर्यंत पगार असेल.

असा भरावा अर्ज
joinindiannavy.gov.in ही वेबसाईट ओपन करावी.
होमपेजवरील करियर आणि जॉब्ज या पर्यायावर क्लिक करावे. नंतर become a sailor वर क्लिक करावे.