भरपूर पैसा आणि साहसपूर्ण आयुष्य जगायचं मग ‘नेव्ही’ मध्ये करा अर्ज ; ‘ही’ आहे अंतिम तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला सागरी भ्रमंतीची आवड असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. नौसेनच्या जून २०२० च्या INET या प्रवेश परीक्षेसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (NOC) च्या रेग्युलर पायलट, पर्यवेक्षक, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्शन कॅडर, लॉजिस्टिक, शिक्षा, इन्फोर्मेंच टेक्नॉलॉजी तसंच टेक्‍न‍ीकल इंजिनियर आणि इलेक्‍ट्र‍िकल इंजिनियर ही पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ मे पासून सुरू झाली असून, २९ मे ही अंतिम तारीख आहे.

पदाची नावे आणि संख्या –

१ ) SSC अर्मामेंट इन्स्‍पेक्‍शन कॅडर (NIAC) -०८ पदे

२ ) SSC ATC – ०४ पदे

३) SSC पर्यवेक्षक – ०६ पदे

४) SSC पायलट (MR) – ०३ पदे

५) SSC (पायलट, यात MR समाविष्ट नाही) – ०५ पदे

६) SSC लॉजिस्‍ट‍िक – १४ पदे

७) SSC XII – १५ पदे

८) SSC इंजिनिअरिंग ब्रान्च जनरल सर्व्हिस – २४ पदे

९) SSC इलेक्‍ट्र‍िकल ब्रांच जनरल सर्व्हिस – १८ पदे

१०) PC एजुकेशन – १८ पदे

SSC (NAIC) अधिकाऱ्यांचा प्रोबेशन कालावधी हा तीन वर्षांचा राहणार आहे. तर इतर शाखा आणि कॅडरमधील अधिकाऱ्यांचा प्रोबेशन कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे.

निवड प्रक्रिया –

INET आणि SSB या दोन्हीच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होईल.
SSB द्वारे निवडण्यात आलेले आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट असलेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या शाखा आणि कॅडर्समधील रिक्त असलेल्या जागांवर योग्यतेनुसार नियुक्ती केली जाईल.

अर्ज भरण्याची तारीख – ६ मे २०१९ ते २९ मे २०१९

विशेष सूचना –

फक्त अविवाहित पुरुष उमेदवारच या जागांसाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणादरम्यान, जर उमेदवार विवाहित आढळल्यास, त्याला सेवेतून काढून टाकलं जाईल आणि सरकारद्वारे त्याच्यावर करण्यात आलेला संपूर्ण खर्च त्याला मिळालेला पगार आणि भत्त्यांसह परत करावा लागेल.