Indian Navy : युद्धनौकेवर पहिल्यांदाच तैनात होणार 2 महिला अधिकारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   युद्धनौकांवर दीर्घकाळासाठी 2 महिला अधिकारी आरुढ होताना दिसणार आहेत. भारतीय नौसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच असणार आहे. लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंह यांना युद्धनौकांवर क्रू मेंबर म्हणून तैनात करण्यात येणार आहे. युद्धनौकांवर तैनात होणाऱ्या भारतीय नौसेनेच्या या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत.

भारतीय नौसेनेत अनेक महिला अधिकारी दाखल होत आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही महिला अधिकाऱ्याला युद्धनौकेवर दीर्घकाळासाठी तैनात करण्यात आलेलं नाही. नौकांवर उपलब्ध असलेल्या क्रू क्वार्टर्समध्ये खासगी स्पेसचा अभाव आणि महिलांसाठी विशेष बाथरूमची व्यवस्था नसणं अशा काही कारणांमुळंही आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना याबाबतीत संधी मिळत नव्हती.