भारतीय लष्कराकडून PoK मध्ये घुसून 18 दहशतवाद्यांसह 16 पाक सैन्यांचा ‘खात्मा’

काश्मीर : वृत्तसंस्था – पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने 19 व 20 ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत18 दहशतवादी ठार झाले असून पाकिस्तानचे 16 सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. तसेच जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होत . पाकिस्तानकडून अचानक भारतीय चौक्यांसह सीमेलगतच्या गावांना लक्ष्य करण्यात आलं होत. त्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यातील दहशतवाद्यांचे चार ते पाच अड्डे उद्ध्वस्त केले. नीलम व्हॅलीत करण्यात आलेल्या जोरदार प्रत्युत्तरात 18 दहशतवादी आणि 16 पाकिस्तानी सैन्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने ही माहिती दिली आहे. या कारवाईत नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला आहे, या बाबत लष्कराकडून अद्याप माहिती मिळाली नाही.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईबद्दल लष्करप्रमुख यांचे अभिनंदन केले आहे. पीओकेतील कोणताही लाँच पॅड सुटता कामा नये, तसेच कारवाई करताना यात कोणत्याही निरपराध व्यक्तीला नुकसान पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांना दिल्या आहेत.

Visit : Policenama.com