Indian Oil Company Function | धक्कादायक ! इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात स्क्रिनवर अचानक अश्लिल Movie; केंद्रीय मंत्री होते उपस्थित

गुवाहाटी : वृत्तसंस्था – Indian Oil Company Function | एका इंडियन ऑईलच्या (Indian Oil Company Function) कार्यक्रमामध्ये स्क्रीनवर अचानक अश्लिल चित्रपट सुरु झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या कार्यक्रमात चक्क केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली (Union Minister Rameshwar Teli) आणि राज्याचे कामगार मंत्री संचय किसान (Sanchay Kisan) उपस्थित होते. हा धक्कादायक प्रकार आसाममधील तिनसुकियात (Assam, Tinsukia) शनिवारी घडला.

 

मिरानातील इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडियन ऑईलच्या मिथेनाॅल मिश्रित एम 15 पेट्रोलच्या पायलट रोलआऊटची सुरुवात या प्रसंगी केली होती. स्क्रिनवर मिथेनाॅल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाची व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. परंतु, व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रिनवर एक अश्लिल चित्रपट निदर्शनास आला. समोर दिसताच कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच गदारोळ माजला. अश्लिल व्हिडिओ काही सेकंद सुरु होता. त्यानंतर तात्काळ ऑपरेटरने तो बंद केला.

 

दरम्यान, ”मी इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्याचे भाषण ऐकत होतो. त्यामुळे माझे लक्ष स्क्रीनकडे नव्हते. पण, माझ्या पीएने घडलेला प्रकार मला सांगितला. प्रोजेक्टर ऑपरेटला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं,” केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितलं.

 

Web Title :- indian oil company function unwanted film screening starts before union minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा